Monday, March 4, 2019

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास अटक


इस्लामपूर,(प्रतिनिधी)-
येथील वीटभट्टीवर मजुरी करणार्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा विनयभं केल्याप्रकरणी मुनिर खार्जेसाब शेख (वय 40, रा. तिरंगा चौक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खाण्याचे व टीव्ही पाहण्याचे आमिष दाखवून संबंधितमुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. हा प्रकार रविवारी सकाळी घडला.
पीडित मुलगी एका आश्रमशाळेत शिकत आहे. आजारी पडल्याने तिला पालकांनी आठ दिवसांपूर्वी घरी आणले होते. पालक तिला रोज वीटभट्टीवर कामाला जाताना सोबत घेऊन जात होते. रात्रीचे काम असल्याने दिवस उजडल्यावर ते मुलगीला सकाळी घरी एकटालाच पाठवीत होते. रविवारी वीटभट्टीवर सकाळी नऊ वाजता काम करत असताना मुलगी रडत-रडत आई जवळ आली. पीडित मुलीला रडण्याचे कारण आईने विचारले असता तिने घराबाहेर वरील आमिष दाखवून त्याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. तो निघून गेल्यावर वीटभट्टीवर जाऊन पीडित मुलीने घडलेली घटना वडिलांना सांगितली. याप्रकरणी मुनिर शेख याच्याविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कोमल पवार अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment