Monday, April 1, 2019

वंचित आघाडीच्या उमेदवारीचा घोळ मिटेना


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली लोकसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी मिळवण्याचा गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न सफल होणार नसल्याची चर्चा आहे. पडळकरांना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी नागपुरात बोलावून घेतले. परंतु त्या अगोदरच पडळकर हे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असलेले व धारकरी म्हणून गडमोहिमेत अनेकदा सहभागी झालेले पुरावे अॅड. आंबेडकरांपर्यंत पोहोचले. त्यामुळे आंबेडकरांनी सांगलीच्या उमेदवारीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिल्याची चर्चा आहे.
त्यामुळे गोपीचंद पडळकर अपक्ष म्हणूनवंचित आघाडीच्या उमेदवारीचा तिढा कायम मैदानात उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या आघाडीनंतर सांगलीची जागा स्वाभिमानीकडे गेल्यानंतर स्वाभिमानीची उमेदवारी देतो, असे सांगून काही नेत्यांनी भाजपचे नाराज नेते गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली होती. परंतु ती उमेदवारी वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्याकडे गेल्याने पडळकरांनी आपण अपक्ष मैदानात उतरणारच. भाजपचे खासदार संजय पाटील यांचा पराभव करण्याचा आपला निर्धार कायम आहे. बहुजन वंचित आघाडीकडे उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे. त्यांचा निर्णय काहीही झाला तरी आपण मैदानापासून दूर जाणार नाही, असेही ते म्हणाले होते. सोमवारी नागपुरातून वंचित आघाडी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु उमेदवारीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याच्या सुचना करण्यात आल्याने पडळकरांना वंचित आघाडीची उमेदवारी मिळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment