Monday, April 1, 2019

जत तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा संधी द्या : संजय पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुका हा कायम स्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यातील कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या, असे प्रतिपादन सांगली लोकसभा भाजप शिवसेना व युतीचे उमेदवार संजय पाटील यांनी केले. जत तालुक्यातील बिळूर, उमराणी, बसर्गी, गुगवाड, वज्रवाङ, गुगवाड, डफळापूर आदी भागात त्यांनी भेटी देऊन मतदारांची थेट संवाद साधला.
यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती प्रकाश जमदाडे, डॉ. रवींद्र आरळी, शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील, शिवाजीराव ताड, संजय कांबळे, आप्पासाहेब नामद, ॅड. प्रभाकर जाधव, सरदार पाटील, सभापती सुशीला तावशी, अजित पाटील, सुनील पवार, अंकुश हुवाळे आदी उपस्थित होते. यावेळी उमेदवार खासदार संजय पाटील यांनी या गावातील अनेक मतदारांशी थेट संपर्क साधला. जत हा दुष्काळी तालुका असून अनेक योजना प्रलंबित आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी संधी द्या, असे आवाहन यावेळी केले.

No comments:

Post a Comment