Sunday, April 7, 2019

जत तालुक्यात शिक्षक संघाला खिंडार


थोरात गटातील कार्यकर्त्यांचा शिक्षक समितीत प्रवेश
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुका प्राथमिक शिक्षक संघात (थोरात गट) फूट पडली असून जत तालुक्याचे सरचिटणीस सुरेश पाटील व शंकर पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिक्षक समितीमध्ये नुकताच प्रवेश केला. यामुळे थोरात गटाला मोठा हादरा बसला आहे. विशेषत: कन्नड माध्यमाच्या शिक्षकांमध्ये समितीचे आणखी वर्चस्व वाढण्यास मदत झाली आहे.

थोरात गटाच्या नेतृत्वाची काम करण्याची चुकीची पद्धत तसेच शिक्षक बँकेच्या प्रत्येक निवडणुकीत स्वतः कसा निवडून येऊ याचा विचार करताना आपल्याच गटातील इतरांना पाडापाडीचे राजकारण, एकाधिकारशाही याला कंटाळून आपण बाहेर पडत असून इथून पुढे शिक्षक समितीचे जिल्हा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका पदाधिकार्यांना बरोबर घेऊन काम करू, असे सुरेश पाटील यांनी सांगितले. यामुळे जत तालूका शिक्षक संघाला (थोरात गट) खिंडार पडले आहे.
जत तालूका शिक्षक समितीची बैठक शिक्षक बँकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी राज्यनेते विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली थोरात गटाचे जत तालुका सरचिटणिस सुरेश पाटील व शंकर पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिक्षक समितीत प्रवेश केला. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा नेते किरण गायकवाड, किसन पाटील, बाबासाहेब लाड, शशीकांत बजबळे, रमेश पाटील, श्रीकांत माळी, राजाराम सावंत, दयानंद मोरे, रामराव मोहीते, धनाजी नरळे, एम.बी. चव्हाण, बलभीमा घाटे, रमेश वायदंडे, दिपक कोळी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment