Monday, May 20, 2019

डफळापूर शाळा क्र.2 च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता-पाचवी ) शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक (इयत्ता-आठवी ) शिष्यवृत्तीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असून त्यात डफळापूर येथील जि.प.मुलींची शाळा नं 2, या शाळेतील विद्यार्थीनी परीक्षेत सलग चौथ्यावर्षी उज्ज्वल यश संपादन केले.

उत्तम नियोजन व त्याप्रमाणे कार्यवाही यामुळेच केंद्रातील प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थीनी या आमच्याच शाळेतील आहेत, असे शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सांगितले. यशस्वी मुलींमध्ये प्रांजली अभिजित चव्हाण(230),जान्हवी संदीप माळी(204),प्राजक्ता हनमंत कोळी(178),ऐश्वर्या आप्पासो चव्हाण(१६४),साक्षी सचिन चव्हाण(150) या आहेत. यशस्वी मुलींचे केंद्राचे केंद्र प्रमुख शंकर बेले,मुख्याधिपिका रेखा कोरे, एस.एम.सी.अध्यक्ष गोटू शिंदे,उपाध्यक्ष हणमंत कोळी यांनी कौतूक केले. शिक्षक उदयोगरत्न संकपाळ, अजेंता लोंढे,शंकर कुंभार, जयश्री मगदूम,आरती कांबळे, मनीषा शिंत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

1 comment: