Sunday, May 26, 2019

रावळगुंडवाडीला 2 जूनला मोफत त्वचारोग शिबीर

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथे रविवार दिनांक 2 जून रोजी  मोफत त्वचारोग शिबिर आयोजित करण्यात आले असून पंचक्रोशीतील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन सत्यम आणि माळी फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

   प्रथमच रावळगुंडवाडी, उंटवाडी, मेंढीगिरी, मुचंडी, देवनाळ,खोजनवाडी आणि पंचक्रोशीतल्या नागरिकांसाठी डॉ.अशोक माळी फाऊंडेशन मिरज (खंडेराजुरी), सत्यम फाऊंडेशन रावळगुंडवाडी व उंटवाडी आणि ग्रामपंचायत रावळगुंडवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२जून २०१९ रोजी मोफत त्वचारोग शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरात फक्त त्वचारोगाचेच रुग्ण तपासले जाणार आहेत. या शिबिरात अंगावरील चट्टे, खाज सुटणे, गजकर्ण, केसांचे व त्वचेचे विकार, नायटे, सोरियासिस इत्यादी आजार तपासले जाणार आहेत. श्री महादेव विद्यालयात हे शिबीर होणार असून  सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
डॉ.अशोक माळी, डॉ.सौ.स्नेहलता माळी, डॉ. सौ.ज्योती पवार हे रुग्णांची तपासणी करणार असून महिला रुग्णांसाठी स्वतंत्र महिला डॉक्टर व स्वतंत्र तपासणी व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्ण तपासणी पुर्णपणे मोफत असेल, परंतु गोळ्या, मलम,औषधे  माफक दरात उपलब्ध असतील. संपर्क करण्यासाठी  बी. आय. हिरगोंड सर - 9011295415, सचिन बडुर - 9766198121, हणमंत हगलंबे -7666526603, उदय पाटील -7875977573

No comments:

Post a Comment