Sunday, May 12, 2019

गुड्डापूरमध्ये पुण्यकर्म चारादान केंद्राची सुरूवात


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात तीव्र चार्याची टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व पाहून येथील दानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट मार्फत गुड्डापूर येथे या पुण्यकर्म चारादान केंद्राची सुरवात करून जनावरांना चार्याचे वितरण करण्यात आले. चारा वाटपाचा शुभारंभ कोल्हापूरचे धर्मादाय सहआयुक्त शशीकांत हेरलेकर, सांगलीच्या धर्मादाय उपआयुक्त सुवर्णा खंडेलवाल -जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना शशीकांत हेरलेकर म्हणाले, मीही दुष्काळी भागातील असल्यामुळे मला दुष्काळी परिस्थितीची जाणीव आहे. जत सारख्या भागात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. दानमादेवी देवस्थान ट्रस्टमार्फत सुरू केलेले चारा वाटप केंद्र स्तुत्य उपक्रम आहे. शेतकर्यांनी झाडे लावून ती जगवली पाहिजेत तरच आपण निसर्गावर मात करू. देवस्थानला लोक दान करतात त्याचा उपयोग अशा समाजिक कार्यासाठी देवस्थानने करावा. सुवर्णा खंडेलवाल - जोशी म्हणाल्या, देवस्थानकडे जमा होणार्या देणगीतून चारादान सारखे सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. समाजातील काही मंडळींनी सामाजिक बांधीलकी म्हणून आज दुष्काळी भागातील पशुधन वाचवण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे.
समारंभाचे प्रमुख पाहुणे  जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे म्हणाले, झाडांची संख्या कमी झाल्याने पाऊसही कमी झाला आहे परिणामी जनावरांना चारा मिळणे ही मुश्किल बनले आहे.भविष्याकाळाचा विचार करता वृक्ष लागवड करणे व ती जगवणे काळाची गरज बनली आहे. यावेळी ट्रस्टच्या वतीने 2500 झाडे लावण्याचा मानस ट्रस्टीने मानस व्यक्त केला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश गणी, विश्वस्त गुरुपाद पुजारी, सिध्दया हिरेमठ, चंद्रशेखर गोब्बी, सचिव विठ्ठल पुजारी, पंचायत समिती उपसभापती अडव्याप्पा घेरडे, धानापा पुजारी, गणी मुल्ला, माजी उपसरपंच धानापा पुजारी, सरपंच चंद्रशेखर पुजारी, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे यांच्यासह गुड्डापूर येथील शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment