Sunday, May 12, 2019

दुष्काळाच्या भयाण अवस्थेने मेंढपाळांची ससेहोलपट


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली असून गेले वर्षभर पावसाचा पत्ता नाही. दोन्ही हंगाम पूर्णपणे वाया गेले. तालुक्यातील 99 टक्के तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. कूपनलिकेला, विहिरीला पाणी नाही. त्यामुळे तालुक्यातल्या मेंढपाळ आणि त्यांच्या मेंढ्या यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला राहिला आहे. त्यांची भटकंती अद्याप संपलेली नाही.

मेंढ्यांना चारा नाही, त्यांना मेंढपाळांनी पाणी पाजायचे कसे? मेंढपाळांची अवस्था मात्र प्रचंड वाईट झाली असून जत पूर्वभागातील अनेक मेंढपाळ व्यावसायिकांनी जत तालुका सोडला आहे, तर अनेक व्यावसायिक जत तालुका सोडण्याच्या मनःस्थितीत आहेत. जत तालुका हा तसा दुष्काळी तालुका वर्षानुवर्षे दुष्काळाशी दोन हात करीत आहे. येथील तालुक्यातील जनता कशीबशी तग धरून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून या तालुक्यातील अनेक शेतकरी वेगवेगळे व्यवसाय करतात. जत तालुक्यात धनगर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 50 एकर शेती असलेल्या शेतकर्याच्या शेतात दरवर्षी एक शेर ज्वारी व एक पेंडी कडबाही येत नाही. त्यामुळे या तालुक्यातील धनगर समाज मेंढपाळ व्यवसाय करून त्यावर आपली उपजीविका करतो. तालुक्यातील अनेक गावांत पूर्वी घर तेथे मेंढ्यांचा खांड अशी परिस्थिती होती. उपजीविकेचे साधन म्हणून मेंढ्यांवर कुटुंबं अवलंबून होती. परिस्थितीवर मात करून अनेक मुले-मुली शिकवल्या, तर बरेच जण चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले आहेत. मात्र मेंढपाळ व्यवसाय अजूनही सुरू आहे. मेंढपाळाचा मुख्य व्यवसाय असताना मात्र या व्यवसायावरती निसर्गाने मात्र गेल्या पाच ते दहा वर्षांत पूर्णपणे घाला घालायला सुरुवात केली आहे. अनेक निवडणुका होतात, अनेक पक्ष निवडून येतात. मात्र या तालुक्यातील मेंढपाळाच्या विषयावरती कोणी बोलायला तयार नाही. मायबाप सरकारने माणसांना जगण्यासाठी माणसी वीस लिटर पाणी टँकरद्वारे देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र तालुक्यातील मेंढपाळांना पिण्याचे पाणी व चारा शासन दरबारी दिला जात नाही. बापजाद्यांपासून सुरू असलेला असलेला हा व्यवसाय आता दुष्काळाच्या दुष्टचक्रात हळूहळू अडकत चालला असून या व्यवसायाकडे मात्र कोणी लक्ष द्यायला तयार नाही. सरकारमध्ये अनेक मंत्री हे गावगाड्यातील आहेत; तेही लक्ष धायला तयार नाहीत. जत तालुक्यातील अनेक गावात डोंगरदर्या, काही ठिकाणी माळरानं आहेत. मेंढ्यांना चारा, पाणी मिळावे म्हणून दर्याखोर्यात रावटी घालून अनेक मेंढपाळ व्यावसायिक मेंढ्या घेऊन थांबतात. मात्र दुष्काळाने त्यांचे जगणे ही असह्य झाले आहे. तालुक्यातील एका घरात मेंढ्या- शेळ्या व आणि जनावरे आहेत. हाच मुख्य व्यवसाय ते समजतात.
आता दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. तालुक्यातील चारा वर्षभरापूर्वीच संपून गेला आहे. झाडेझुडपे सुकून गेली आहेत. झुडपांची पालवी सुद्धा वाळून गेली आहे. झाडाझुडपांना राहिल्या त्या वाळक्या काटक्या; पर मेंढ्या अडवायच्या तरी कुठे? न्यायचं म्हटलं तर कुठं न्यायचं. चार्याचे दर गगनाला भिडले आहेत. आणखी दोन महिने काढायचे कसे? जत तालुक्यातील मेंढपाळ व्यावसायिक अत्यंत व्याकुळ झाला आहे. वाडवडिलार्जित मेंढपाळ व्यवसाय जत हा सांगली जिल्ह्यातील शेवटचा तालुका आहे. सीमा भागावर वसलेला हा तालुका विकासात मात्र कोसो दूर आहे. शासनाच्या हजारो योजना मंजूर होतात. मात्र गावगाड्यापर्यंत या योजना पोहोचत नाहीत. मेंढपाळ व्यवसायासाठी सुद्धा अनेक योजना आहेत. मात्र तालुक्यात आतापर्यंत या योजना मिळाल्या नाहीत. गेल्या सहाशे वर्षांपासून हा व्यवसाय येथील लोक करतात. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून पडत असलेल्या भीषण दुष्काळाचा फटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात बसत असून तालुक्यातील हळूहळू मेंढपाळ व्यवसाय हा मोडकळीस येऊ लागला आहे.
 मेंढपाळ व्यावसायिकांच्या पोटावर पाय देण्याचं काम हा निसर्ग करू लागला आहे. शासनाने या मेंढपाळ व्यवसायाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून हा मेंढपाळ व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी त्यातील मेंढ्यांना पाणी व चार्याची विशेष व्यवस्था करावी, असे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तम्माजी कुलाळ यांनी सांगितले. उपजीविकेचे साधन मेंढपाळ व्यवसाय जत हा सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असला तरी या तालुक्यात खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. कधीतरी चार-पाच वर्षांतून एकदा पाऊस पडतो. मात्र अनेक वर्षे या तालुक्यात पावसाचा पत्ता नसतो . त्यामुळे शेतीतील उत्पन्न येत नाही. त्यामुळे धनगर बांधवांबरोबर इतर समाजातील अनेक लोक त्यांचा कळप करून उपजीविकेचे साधन म्हणून लोक मेंढीपालन करत असतात. मेंढपाळाच्या व्यवसायावरच या तालुक्यातील अनेक मेंढपाळांची मुले शिक्षक, डॉक्टर, वकील, कृषी अधिकारी झाली आहेत. अनेक मुलांनी या व्यवसायाला मदत केली आहे. त्यामुळे हा व्यवसाय जिवंत ठेवला असून दुष्काळामुळे मात्र या उपजीविकेचे साधन असलेल्या मेंढपाळ व्यवसायावरच कुर्हाड कोसळली असून तालुक्यातील अनेक मेंढपाळ व्यावसायिक परगावी गेले आहेत.
अनेक मेंढपाळ व्यावसायिक बाहेरगावी जाण्याच्या तयारीत आहेत. मायबाप सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी बिळूर (ता. जत) येथील काँग्रेस पक्षाचे युवानेते श्रीशैल पाटील यांनी केली. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव गेल्या अनेक वर्षांपासूनम्हैसाळचे पाणी या तालुक्यात मिळावे, यासाठी या भागातील लोक टाहो फोडत आहे. 1987 ला योजनेला सुरुवात झाली. 30 वर्षे पूर्ण झाली तरी या तालुक्याच्या पूर्वभागातील गावांनाम्हैसाळचे पाणी येण्याची शक्यता धुसर वाटत आहे. गेल्या तीस वर्षांत तालुक्यातील अनेक आमदार व खासदारम्हैसाळच्या पाण्यावर निवडून आणले. तालुक्याच्या विकासाऐवजी स्वतःचा विकास करण्यात या आमदारांनी धन्यता मानली. तालुक्यातीलम्हैसाळचे पाणी हे थेट गावागावांत मिळाले पाहिजे यासाठी जिल्ह्यातील आमदार असो किंवा खासदार असो यांनी जत तालुक्यातील या पाण्यासाठी कधी तोंड उघडले नाही. निवडणुका आल्या की, मोठी आश्वासने द्यायची. निवङणुकीचा धुरळा बसायच्या आतम्हैसाळच्या पाण्याचे दिलेले पाण्याचे आश्वासन हवेत विरून जायचे. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासून या तालुक्यातील जनताम्हैसाळच्या पाण्याची वाट पाहत आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेच या तालुक्याच्या पूर्वभागातम्हैसाळचे पाणी आले नसल्याची प्रतिक्रिया अनेक शेतकर्यांनी व मेंढपाळांनी सांगितले.

No comments:

Post a Comment