Monday, May 13, 2019

‘वंचित’ला एकही जागा मिळणार नाही


केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे मत
 जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्रात सत्तेत केवळ सेना-भाजप अथवा काँग्रेस-राष्ट्रवादीच चालू शकते. इथे तिसरी आघाडी चालत नाही याचा अनुभव आपण घेतला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला राज्यात एकही जागा मिळणार नसल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

आठवले हे दुष्काळी दौर्यानिमित्ताने जत तालुक्यात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेची आशा दाखविल्याने वंचित समाजातील कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले आहेत. मात्र, हे कार्यकर्ते अपरिपक्व असून निकालानंतर ते सत्तेसाठी आपल्याकडेच येणार आहेत. उलट या वंचित बहुजन आघाडीचा महायुतीलाच फायदा होणार असून महाराष्ट्रातील किमान 38 जागा महायुतीला मिळतील. राज ठाकरे यांच्या सभांचाही महायुतीच्या जागांवर काही परिणाम होणार नाही, असे सांगून राज यांना सभा घेण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेसने बळ दिल्याचा आरोपही आठवले यांनी केला. ॅड. आंबेडकर यांनी अकोला व सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढली. मात्र, त्यांनी दोन ठिकाणी उभे राहायला नको होते. एकट्याच्या ताकदीवर ते निवडून येऊ शकत नाहीत. मागेही ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. महाराष्ट्रात तिसर्या आघाडीला लोक स्वीकारत नाहीत. त्यामुळे फार तर अॅड. आंबेडकरांना लाखभर मते पडतील. मात्र, वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नसल्याचे आठवले यांनी ठासून सांगितले.
दुष्काळी दौर्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, आपण विदर्भातील वर्धा, यवतमाळ, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना भेटी देऊन तेथील दुष्काळाची पाहणी केली आहे. अतिशय भीषण अशी दुष्काळी परिस्थिती असून सगळीकडे चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर्स सुरू आहेत. या दुष्काळी परिस्थितीला सर्वस्वी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच जबाबदार असून त्यांच्या काळात सिंचनाची कामे झाली असती तर आज ही परिस्थिती आली नसती, असे आठवले म्हणाले. महाराष्ट्र दुष्काळामुक्त करायचा झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील नदीजोड योजना पूर्णत्वास आणावी लागेल. तसेच मुंबई-कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पडणार्या पावसाचे वाया जाणारे पाणी आडवावे लागेल. त्यासाठी अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांची समिती नेमावी, अशी आपण मागणी करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.    
     लोकसभा निवडणुकीत भाजपला किमान 260 जागा मिळतील. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच सत्ता राहणार असल्याचा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. रिपाइं विधानसभेच्या आठ ते दहा जागा लढविणार  रिपाइं महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत आठ ते दहा जागा लढविणार असून तशी मागणी महायुतीकडे करणार आहे. तसेच सत्ता आल्यावर एक मंत्रिपद, एक महामंडळाचे अध्यक्षपदही मागणार असल्याचे केंद्रीयमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment