Tuesday, May 14, 2019

डफळापूर येथे चारा छावणी व पाण्याच्या टँकरसाठी रास्ता रोको

 (डफळापूर येथे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर नायब तहसीलदार श्री. माळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.)
जत,(प्रतिनिधी)-
      पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या डफळापूर गावात सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर या मूळे पाण्याचा धंदा करणाऱ्याचे फावले आहे. पाण्याचे टँकर सुरू करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी काल (मंगळवारी) डफळापूर बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. डफळापूरसह परिसरातील गावेदेखील पाण्यापासून वंचित राहिले आहेत. डफळापूरला  शासनाने सहा नळपाणी पुरवठा योजना राबविल्या आहेत. तरी ही गावाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही . टंचाई मधून डफळापूर व मिरवाड पाझर तलाव भरुन देण्यात यावे.जनावरांसाठी चारा छावणी सुरू कराव्यात.  शेळ्या मेंढ्यांना त्या चारा छावणी मध्ये सामिल करुन घेण्यात यावे.असे निवेदन नायब तहसिलदार  श्री.माळी यांना देण्यात आले.या रास्ता रोको आंदोलणाचे नेतृत्व कॉम्रेड हणमंत कोळी यांनी केले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोपीचंद पडळकर , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे, अधिक भोसले,अतुल शिंदे,गौस मकानदार, विशाल पाटोळे, विशाल शिंदे,सुनिल छत्रे, अशोक स्वामी, करण जाधव,नितीन पाटील, रमेश बंडगर,महेश जगताप, शिवाजी पाटील, स्वप्नील हांंडे, भैय्या हांडे यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला.
 चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर याबरोबरच गायी म्हशीबरोबर शेळ्या मेंढ्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. प्रति माणसी पाणी पुरवठा वाढविण्याबरोबर प्रति जनावर पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. रोजगार हमी योजनाचे कामे सुरू करण्यात यावे. वीज कनेक्शन तोडणी थांबवावी.त्याचबरोबर शेतसारा वसुली थांबवावी आदी मागण्या करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment