Thursday, May 16, 2019

बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सागर चव्हाण


जत,(प्रतिनिधी)-
 डफळापूर (ता. जत) येथील सागर चव्हाण यांची बळीराजा शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश देशमुख यांनी दिले आहे. बळीराजा शेतकरी संघटना ही शेतकरी, कष्टकर्यांच्या समस्या सोडविणे, शेतकर्यांना दिलासा देणे, कष्टकर्यांच्या सर्वसामान्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यरत आहे.

डफळापूर येथील सागर चव्हाण हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच धडपड केली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून त्यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची संधी दिली आहे. यावेळी विविध मंडळांच्या वतीने त्यांचा डफळापूर येथे सत्कार करण्यात आला. यानंतर बोलताना ते म्हणाले की जत हा दुष्काळी तालुका हा दुष्काळी तालुक्यातील शेतकर्यांना वेगवेगळ्या सेवासुविधा व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment