Tuesday, May 7, 2019

मुचंडी येथे चारा छावणी सुरू करा


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात दुष्काळाची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुचंडी व परिसरातील अनेक गावांत चाराटंचाईची भीषण अवस्था निर्माण झाली असून शेतकर्यांना जनावरे विकण्याची वेळ आली आहे. याची दखल घेऊन तातडीने चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी मुचंडीचे सरपंच अशोकराव पाटील यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली.

मंत्री महादेव जानकर दुष्काळी आढावा घेण्यासाठी मुचंडी (ता. जत) येथे आले होते त्यावेळी परिसरातील अनेक शेतकर्यांनी त्यांच्या व्यथा यावेळी सांगितल्या. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगताप, ॅड. प्रभाकर जाधव, सरदार पाटील, रासपचे अजितराव पाटील, रासपचे जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, भूषण काळगी, नगरसेवक उमेश सावंत आदी उपस्थित होते. अशोकराव पाटील यांनी जत तालुक्याच्या परिसरात चारा टंचाई निर्माण झाली असून तालुक्यातून 103 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जनावरांना चारा नसल्याने अनेक शेतकरी आपली जनावरे विकत असून काही शेतकरी आपली जनावरे कर्नाटकातील पै-पाहुणे यांच्याकडे पाठवून देत आहेत. त्यामुळे तातडीने चारा छावण्या चालू करून शेतकर्यांना दिलासा द्यावा व जनावरे वाचावीत, अशी मागणी केली. तर अनेक शेतकर्यांनीही चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी केली. यावर मंत्री जानकर यांनी येणार्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने चारा मार्गी लावू, अशी ग्वाही दिली.

No comments:

Post a Comment