Thursday, May 30, 2019

बसवराज पाटील यांना तालुका आदर्श सरपंच पुरस्कार

जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्यातील सर्व  सरपंचांचे अधिवेशन नुकतेच शिर्डी  येथील शांतीकमल हॉटेल येथे मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी  राज्यस्तरीय आदर्श सरपंच व  उद्योजक पुरस्कार वितरण व  सन्मान सोहळा संपन्न झाला. या अधिवेशनात  सांगली जिल्ह्यातील  एकुंडी (ता. जत) येथील सरपंच बसवराज पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
 भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते जत तालुका आदर्श सरपंच पुरस्कार सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन  सन्मानित करण्यात आले.  यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, शिर्डी साईबाबा  संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.पी मुगळीकर, ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे, यादवराव पावसे, लालुशेठ दळवी, राज्यातील कार्यकारिणी, विभागीय, जिल्हा, तालुका, पदाधिकारी सरपंच, उपसरपंच व  सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment