Monday, May 20, 2019

सरकारला जागे करून शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ


जत,(प्रतिनिधी)-
 पतंगराव कदम सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मागील दुष्काळात जनतेला लागेल ती मदत केली. असे असताना आताचे शासन मात्र शेतकर्याकडे दुर्लक्ष करत आहे. झोपी गेलेल्या सरकारला येत्या अधिवेशनात धारेवर धरून जागे करून उपाययोजना करण्यास भाग पाडू. शिवाय आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून दुष्काळी भागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी; प्रसंगी स्वतः चारा छावणी काढण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.

 सोन्याळ (ता. जत) येथे आयोजित दुष्काळ पाहणी दौर्यात ते बोलत होते. जत तालुका भीषण दुष्काळाशी सामना करत असून सर्वत्र पाणी आणि चाराटंचाई तीव्र बनली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीची पाहणी आणि शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सोन्याळ येथे आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार रामहरी रुपनवर, आमदार शरद रणपिसे, जतचे काँग्रेसचे नेते विक्रमदादा सावंत, शैलजा पाटील आणि काँग्रेस पदाधिकारी व आमदारांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. येथील शेतकर्यांशी संवाद साधून आढावा घेतला. दुष्काळग्रस्त डाळिंब उत्पादक शेतकर्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती संतोष पाटील यांनी युती शासनाच्या धोरणावर टीका करत चारा छावणी सुरू करून शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
 यावेळी नामदेवराव मोहिते, जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिरादार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, जत तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष कुंडलिक पाटील, पंचायत समिती सदस्य आप्पा मासाळ, नाना शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष युवराज बाळ निकम, गणी मुल्ला, दयानंद मुचंडी, अभिजित कांबळे, शिवगोंडा निवर्गी, हणमंत शिंदे, सुरेश तेली, श्रीशैल बिरादार, अशोक बिरादार, नितीन शिंदे, लकडेवाडीचे सरपंच एकनाथ बंडगर, उटगीचे सरपंच भीमणा बिरादार, माडग्याळचे सरपंच आप्पू जत्ती, बाळू कोरे, मारुती कोरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment