Tuesday, May 7, 2019

जतमध्ये एक लाखाचा मुद्देमाल चोरीला

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील विद्यानगर उपनगरातील रवींद्र दत्तात्रय  इंगळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील किचन मधील कपाटात असलेले रोख एक लाख रुपये व दीड हजार रुपये किमतीचे चांदीचे पैजण असा एक लाख एक हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना चार ते सहा मे दरम्यान रात्री घडली आहे. याप्रकरणी रवींद्र दत्तात्रय इंगळे यांनी आज जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे .

     याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की रवींद्र इंगळे हे विद्या नगर येथील अप्पासाहेब शेडबाळे यांच्या घरी भाड्याने राहतात त्यांचा औद्योगिक वसाहत जत येथे प्लास्टिक जोडणीचा  कारखाना आहे . नाशिक येथे कार्यक्रमासाठी चार एप्रिल रोजी सकाळी ते सहकुटुंब गेले होते आज सकाळी गावावरून परत आल्यानंतर त्यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले .अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप कटावनीने तोडून घरातील किचन मधील कपाटात असलेले रोख एक लाख रुपये व पायातील चांदीचे पैंजण असा एक लाख एक हजार पाचसे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय वीर करत आहेत.

No comments:

Post a Comment