Friday, May 17, 2019

जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांना मिळणार मानधन


जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषद व समाज कल्याण यांच्यावतीने या वर्षी 60 कलावंतांची मानधनासाठी निवड करण्यात आली आहे. 9 तालुक्यातुन 60 जणांची निवड झाली आहे. ही योजना सन 1954-55 पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये वृद्ध कलावंत, साहित्यिक यांनी मोलाची भर घातली आहे अशा व्यक्तीचा समावेश शासकीय कलाकार मानधनासाठी केला जातो.

 कला आणि वाङ्मय क्षेत्रात किमान 15 ते 20 वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. जे शासकीय सेवेत नाहीत, अशा स्त्री-पुरूष कलाकार व साहित्यिकांचे 50 वर्षे पूर्ण, तर अर्धांगवायू, क्षय, कर्करोग, कुष्ठरोग या रोगांनी आजारी असतील आणि ज्यांना जन्मता व अपघाताने 40 टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक व्यंग किंवा अपंगत्व आले असेल , अशा साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथिल करण्यात येते. योजनेच्या निकषानुसार पात्र ठरणारे अर्ज जिल्हास्तरीय निवड समितीच्या मान्यतेने जाहीर केली जाते. जिल्हास्तरीय निवड समिती पात्र अर्जातून प्रतिवर्षी मर्यादेत 60 लाभार्थ्यांची मानधनासाठी निवड करतात. निवड झालेल्या लाभार्थ्यांना तहहयात मानधन देण्यात येते. शासनाच्या या योजनेमुळे कलावंतांना अधार मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. तालुकानिहाय कलावंतांची निवड व संख्या : मिरज-14, तासगाव -8, पलूस-8, खानापूर-5, शिराळा-3, कडेगाव-5, वाळवा-10, कवठे-हांकाळ-3, जत-4.
कलावंतांची वर्गवारी व मानधनाची रक्कम राष्ट्रीय कलावंत- अ वर्ग - 2,100 प्रतिमहिना राज्यस्तरीय कलावंत - ब वर्ग - 1,800 प्रतिमहिना स्थानिक कलावंत- क वर्ग 1500 प्रतिमहिना

No comments:

Post a Comment