Monday, May 13, 2019

दुष्काळी भागातील केशरी कार्डधारकांना मोफत धान्य द्या


 सुशिला होनमोरे यांची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत तत्काळ चारा छावणी तसेच दुष्काळी भागातील केशरी कार्डधारकांना मोफत धान्यपुरवठा करावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुशिला होनमोरे यांनी केली आहे.

    जत तालुक्यात भीषण दुष्काळ पडला असून यातून शेतकरी आणि मजुरांना सावरण्याची गरज आहे. शासनाने जनावरे जगविण्यासाठी प्रत्येक गावात छावणी, मजुरांना मागणीप्रमाणे काम, केशरी कार्डधारकांना मोफत धान्य, पाणी समस्या असेल तिथे टँकर सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुशिला होनमोरे यांनी केली आहे. शेतकरी पेन्शनची मागणी अद्याप मार्गी लागली नाही. पेन्शन मागणीसाठीचा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला. तालुक्यातील केशरी कार्डधारकांना हक्काचे धान्य मिळावे म्हणून कृती समिती स्थापन करण्यात आली.

No comments:

Post a Comment