Wednesday, June 19, 2019

जत तालुक्यात 116 गावांच्या दप्तरांची चौकशी


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील 52 गावांमध्ये एलईडी घोटाळा झाला असल्याच्या तक्रारी सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. त्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले होते. त्यानुसार  जत तालुक्यातील 116 गावांच्या दप्तराची चौकशी एलईडी खरेदी संबंधात केली आहे. याबाबतचा अहवाल दोन दिवसांत जिल्हा परिषदेला सादर होणार आहे

तीन लाखांपेक्षा जास्तची खरेदी-निविदेने करावी लागत असताना, याला पर्याय म्हणून अवघ्या हजार लोकवस्ती असणार्या गावांमध्येही 7 ते 8 लाख रुपयांची एलईडी खरेदी पेपर नोटीसवर केल्या असल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यावर जत तालुक्यातील गावांची तपासणी करून चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष देशमुख यांनी दिले होते. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी या ग्रामपंचायतींमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले होते. त्यानुसार जत तालुक्यातील सर्वच 116 गावांच्या एलईडी खरेदीची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित 52 गावांसह इतर 116 गावांच्या दप्तराची चौकशी पंचायत समितीमध्ये करण्यात आली. चौकशीसाठी 20 विस्तार अधिकार्यांच्या 10 पथकांची नेमणूक करण्यात आली होती. ही पथके जत तालुक्यातील उर्वरित गावांचीही दप्तर तापसणी करून दोन दिवसांत जिल्हा परिषदेला अहवाल सादर करणार आहेत.
जि. . सदस्यांची कंपनीविरोधात तक्रार केली आहे. जिल्हा परिषद सदस्या सुनिता पवार यांनी जिल्हा परिषदेकडे जत तालुक्यातील एलईडी घोटाळ्याप्रकरणी मे. फस्टग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीविरोधात तक्रार दिली आहे. 52 गावांमध्ये कंपनीने संगनमताने अपहार केला असून एकाच वर्षात 3 लाखांपेक्षा जास्त रक्कम ग्रामसेवकांना हाताशी धरून केवळ एलईडीवर खर्च केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment