Sunday, June 2, 2019

2016 नंतर चटोपाध्याय प्राप्त शिक्षकांवरील अन्यायाविरुद्ध विधीमंडळात आवाज उठवणार: कपिल पाटील

 फोटो ओळी--(डावीकडून चंद्रशेखर क्षीरसागर,शिक्षक आमदार कपिल पाटील,सुभाष गायकवाड)
जत,(प्रतिनिधी)-
    7 व्या वेतन आयोगमध्ये 1 जानेवारी 2016 नंतर चटोपाध्याय प्राप्त शिक्षकांच्या पगारात खूप कमी वाढ होत आहे.या अन्यायाचा पाढा सांगली जिल्हा शिक्षक भारतीचे श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासमोर मुंबई येथे मांडला.या वेतन आयोगात कर्मचारी व शिक्षक यांच्या वेतनात  वाढ होत असताना ज्या शिक्षकांना 1 जानेवारी 2016 नंतर चटोपाध्याय प्राप्त  झाला आहे ,त्या शिक्षकांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे, त्याविरुद्ध विधिमंडळात नक्कीच आवाज उठवून हा अन्याय दूर करू असे आश्वासन  तडफदार शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी  दिले.

येत्या अधिवेशनात या प्रश्नावर अत्यंत आक्रमक व सकारात्मकतेने हा विषय मांडून हा अन्याय दूर करण्याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न नक्की करू असेही त्यांनी सांगितले.
   जिल्हा अंतर्गत बदल्यात रँडम व विस्थापित व  अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देणेसाठी वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊ असेही त्यांनी सांगितले.तसेच या वर्षी होणाऱ्या जिल्हाअंतर्गत बदल्यात जर कोणावर अन्याय झाला तर  त्यांनी संबंधित जिल्हा शिक्षक भारतीशी स्पष्टपणे संपर्क साधावा असेही सांगितले.त्याविरुद्ध आवाज उठवू असेही ते म्हणाले.
  यावेळी कपिल पाटील  यांनी सांगली जिल्हा शिक्षक भारतीच्या सर्वांगी कामाचे विशेष कौतुक करून सांगली जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी सांगली शिक्षक भारतीच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
   यावेळी श्री.चंद्रशेखर क्षीरसागर,सुभाष गायकवाड व इतर शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment