Friday, June 28, 2019

स्वातंत्र्यसैनिक बुकटे यांच्या स्मारकाचे 30 रोजी लोकार्पण


जत,(प्रतिनिधी)-
कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील स्वातंत्र्य सेनानी कै. बाळकृष्ण ज्ञानोबा बुकटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण व स्म्रुती दिनानिमित्त स्मारक उभारण्यात आले असून या स्मारकाचे लोकार्पण रविवार दि.30 जून रोजी होणार असल्याची माहिती बुकटे परिवार यांच्यावतीने देण्यात आली आहे.

स्वातंत्र्य सेनानी बाळकृष्ण बुकटे यांनी कै. वसंतदादा पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतीसिंह नाथाजी लाड यांच्या सोबत काम केले आहे. ब्रिटीशांविरोधात व्रुत्तपत्र काढत असताना त्यांना अटक करण्यात आली होती. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांनी समाजकार्यात सहभाग घेतला.  सरकारी कामात त्यांचा दबदबा होता. असलेल्या लोकांची ते कामे करून देत. तसेच त्यांनी आपल्या गावी विविध देवतांची मंदीरे उभारली आहेत. अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांचे निधन गेल्या वर्षी 30 जून रोजी झाला. रविवारी 30 जून रोजी मळणगाव - सांगली रस्त्यावरील त्यांच्या शेतात कै.बुकटे यांचे स्मारक उभारले असून या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थ व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बुकटे परिवार सांगली व मळणगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment