Thursday, June 27, 2019

भारतात वर्षाला 90 हजार कोटींची अन्नाची नासाडी

'वर्ल्ड सस्टेनेबल गॅस्ट्रोनोमी डे' म्हणजे जगभरात वाया जाणारे अन्न वाचवण्याचा दिवस. 18 जूनला हा दिवस पाळला जातो. या दिवशी शेतकरी, गोदाम, फुड प्रोसेसिंग करणारे युनिट आणि विक्रेते यापैकी कोणाकडूनही अन्न वाया जाऊ नये, यावर लक्ष ठेवले जाते. संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी
संघटनेनुसार संपूर्ण जगभरात दरवर्षी तब्बल 1.30 लाख कोटी किलो खाद्यपदार्थ वाया जातात. भारतात वर्षाला 6,700 कोटी किलो खाद्यपदार्थ वाया जातात. किमतीत हे अन्नपदार्थ 90 हजार कोटींचे आहेत.

एवढ्या अन्नात दारिद्र्यरेषेखालील 26 कोटी नागरिकांचे सहा महिने पोट भरू शकते. देशात दरवर्षी 2100 कोटी किलो गहू खराब होतात. ऑस्ट्रेलियातल्या सर्व शेतक-यांचे मिळून 2100 कोटी गव्हाचे उत्पादन होते.  मुंबई महापालिकेनुसार मुंबईमध्ये दररोज 94 लाख किलो घनकचरा निघतो. यात 73 टक्के (म्हणजे 65.62 लाख किलो) खाद्यपदार्थ असतात. देशात वर्षाला 6,700 कोटी किलो खाद्यपदार्थ वाया जाते. याची किंमत 90 हजार कोटी असून दररोज 244 कोटी रुपयांचे अन्न वाया जाते.
2030 पर्यंत जगात 2.1 अब्ज टन अन्न वाया
संयुक्त राष्ट्राने यावेळी 'अॅक्ट नाऊ' ही मोहीम सुरू केली
आहे. त्यामुळे वाया जाणारे अन्न वाचवले जाईल. यासाठी यूएनने जगभरातील शेफमंडळींना (स्वयंपाकी) या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सांगितले आहे. जगभरात ज्या वेगाने अन्न वाया जात आहे, त्या वेगाने सुरूच राहिल्यास 2030 पर्यंत जगात दरवर्षी 2.1 अब्ज टन अन्न वाया जाईल.
वर्षाला १९ कोटी नागरिक उपाशी
देशात वर्षाला 19.40 कोटी नागरिक उपाशी राहतात
मध्यान्ह भोजन योजनेतून 12 कोटी माणसांना दररोज जेवण दिले जाते. प्रत्येक व्यक्तीला भोजन आणि रोजगार उपलब्ध  करून देण्यासाठी काही कोटी रुपये खर्च होतात. तरीही संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार देशात प्रत्येक वर्षी  भूक अथवा कुपोषणामुळे पाच वर्षे वयोगटातल्या 10 लाख मुलांचा मृत्यू होतो. 'भारतीय लोक प्रशासन' संस्थेच्या अहवालानुसार देशात दरवर्षी 23 मिलियन टन  डाळ,12 मिलियन टन फळ आणि 21 मिलियन टन भाज्या , वितरण प्रणालीमुळे खराब होतात.
53 देशांत 11.3 कोटी नागरिक उपाशी
संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी संघटना (एफएओ) च्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार 53 देशात 11.3 कोटीपेक्षा अधिक नागरिक भूकबळी ठरतात. या समस्यांचा सर्वाधिक सामना आफ्रिका करत आहेत. युद्धात होरपळणारे येमन, सीरिया, अफगाणिस्तान आणि डेमोक्रेटिक रिपब्लिनक ऑफ कांगोत मिळून जगातल्या एकूण भूकबळींपैकी दोन तृतीयांश बळी जातात.

No comments:

Post a Comment