Saturday, June 1, 2019

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

जत,(प्रतिनिधी)-
जत पोलीस ठाण्याच्या पथकाने वायफळ परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून सुमारे सहा लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वाळू वाहतूक करणाऱ्या संतोष  शिवदास माने या ट्रॅक्टर चालकाला अटक करण्यात आली आहे.

जत पोलीस ठाण्याचे एक पथक वळसंग,निगडी,काराजनगी, वायफळ परिसरात गस्त घालत असताना एक ट्रॅक्टर वेगाने जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आढळून आले. ट्रॅक्टरचा पाठलाग केला असता,त्यात एक ब्रास वाळू असल्याचे आढळून आले. पथकाने सहा लाख किंमतीचा महिंद्रा ट्रॅक्टर आणि दहा हजार किंमतीची वाळू असा मिळून सहा लाख सहा हजार किंमतीचा ऐवज  जप्त केला. तसेच वाहन चालक संतोष शिवदास माने आणि मालक दत्ता रावसाहेब पवार (रा. काराजनगी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment