Monday, June 10, 2019

म्हैसाळच्या पाण्यासाठी कुंभारीत रास्ता रोको आंदोलन

जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यातून येणारे पाणी पैसे भरुनहीं सोडण्यात आले नाही. पाणी सोडावे म्हणून जत तालुक्यातील कुंभारी,  प्रतापपूर, गुळवंची , कोसारी,  बिरनाळ,  तिप्पेहळी बागेवाडी या गावातील शेतकऱ्यांनी विजापूर ते गुहागर राज्यमार्गावरकुंभारी येथे  सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे  विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

     म्हैशाळ योजनेचे पाणी सुरू करावे व त्यातून पैसे भरलेल्या व मागणी असलेल्या गावांना पाणी द्यावे. सहा महिन्यापूर्वी पैसे भरण्यात आले आहेत. परंतु अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. सध्या गावात पाणी व चारा टंचाई जाणवत असून बागायती पिके वाळू लागली आहेत.  पाण्याची  नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे रास्ता  रोको आंदोलन केले असल्याची माहिती नाथा पाटील यांनी दिली.
     आंदोलनस्थळी  नायब तहसीलदार  संजय पवार यांनी भेट दिली  व निवेदन स्वीकारले  यावेळी नाथा पाटील, अविनाश सुतार,  नितीन सूर्यवंशी,  दिलीप यादव, नवाज मुजावर , बापू जाधव, शंकर जाधव,  नानासाहेब सूर्यवंशी, तिप्पेहळळीचे प्रताप शिंदे, सुनिल जाधव, शिवाजी बंडगर आदी उपस्थित होते.   म्हैसाळ योजनेचे आधिकारी ए.बी.कर्नाळे यांनी पाच-सहा दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

No comments:

Post a Comment