Tuesday, June 11, 2019

पाणी पिण्याबाबतचे नियम...

पाणी किती प्यावे, केव्हा प्यावे. गरम की थंड प्यावे याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आपल्याकडे दिसतात. मात्र पाण्याबाबतचे नेमके काय नियम आहेत, हे जाणून घेऊया.आपले शरीर दुखत असेल तर आपल्याला गरम पाण्याचे सेवन आवर्जून केले पाहिजे. गरम पाणी प्यायल्याने आपल्याला डोकेदुखी, पोटदुखी आणि शरीराचे दुखणे या समस्यांपासून आराम मिळेल. आपल्या त्वचेसंबंधी वारंवार समस्या होणार नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गरम पाणी प्यायल्याने आपल्या त्वचेत ओलावा राहतो. त्यामुळे त्वचेच्या रोगांपासून बचाव होतो. याच्या व्यतिरिक्त गरम पाणी केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे केसांचा चमकदारपणा वाढतो, तसेच केसांच्या वाढीसाठीही मदतकारक ठरते.
प्रामुख्याने गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, पचनक्रिया सुधारल्याने एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. त्यामुळे जेवल्यानंतर एक कप गरम पाणी पीत जा, असा सल्ला आवर्जून दिला जातो. जसजसे आपण उतारवयाकडे झुकतो, तसतसे चेहर्‍यावर पडणार्?या सुरकुत्यांमुळे आपण चिंतीत होत जातो. सुरकुत्या येणे ही एक नैसर्गिक बाब आहे, परंतु इतरांच्या तुलनेत जास्त व लवकर चेहर्‍यावर सुरकुत्या येत असतील तर ही चिंतेची बाब आहे. ही समस्या दूर करायची असेल तर त्यासाठी गरम पाणी प्यायला सुरुवात करा. काही दिवसांतच आपल्याला फरक जाणवेल. आपली त्वचा चमकदार होईल, चेहर्‍यावरील पिंपल्स दूर होण्यास, आपल्या चेहर्‍याचा रंग उजळण्यास आणि चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळत असल्याचे आपल्याला जाणवेल.
गरम पाण्याचे इतके सारे उपयोग असूनही आपण ते समजून घेण्यात कमी पडतो असे मात्र आपल्याकडे सार्वत्रिक चित्र दिसते. उन्हाळ्यात तर लोक सर्वात जास्त थंड पाणी पितात आणि जास्त करून लोक फ्रीजमधील पाणी पितात. इतकेच नाही तर अनेकजण बाहेरून, उन्हातून आल्या आल्या ते फ्रीजमधील थंड पाणी पितात. थंड पाणी प्यायल्यामुळे आपल्याला आराम मिळतो, पण याचे काही दुष्परिणामदेखील आहेत. सतत थंड पाणी पिण्याने बरेच आजारदेखील होतात आणि फ्रीजचे थंड पाणी पिण्याने तर जास्त आणि दूरगामी नुकसान होण्याची शक्यता असते. फ्रीजमधील थंड पाणी आपली पचनक्रिया बिघडवण्याची शक्यता अधिक असते. फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्यामुळे आपल्या पोटाच्या वाहिन्या आखडतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा प्रदान करणारे तत्त्व आणि नसा कमजोर होतात. म्हणून आपण फ्रीजमधील थंड पाणी पिण्याचे टाळलेलेच बरे!
अर्थात या अनुषंगाने आपल्याला आपल्या शरीराच्या तापमानाबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. मग आपल्याला लक्षात येईल की शरीराच्या तापमानानुसार आपल्याला कोणतं पाणी प्यायला हवे ते. माणसाच्या शरीराचे तापमान ९८ डिग्री सेल्सियस असते. त्यानुसार शरीरासाठी २0-२२ डिग्री तापमान असलेले पाणी योग्य असते. जर आपण याहून जास्त थंड पाणी पित असाल तर हे पाणी पचवायला शरीर जास्त वेळ घेईल हे निश्‍चित आहे. बफार्चे पाणी पचण्यासाठी ६ तास लागतात तसेच पाणी गरम करून ते पाणी थंड झाल्यावर पिण्याने पाणी पचायला ३ तास लागतात. कोमट पाणी तर फक्त 1 तासात पचते व मायग्रेनपासून दूर ठेवते, असेही सांगतात. थंड पाणी पिण्याने आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यापायी शरीरात बल्गम जमा होतो, रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते आणि आपल्याला सर्दी, खोकला असे त्रास वारंवार होण्याची शक्यता वाढते, असे अनेक अभ्यासांतून समोर आले आहे. आपल्याला कदाचित माहीत नसेल; थंड पाणी पिण्याने आपल्याला मूळव्याधीसारखी समस्याही होऊ शकते. हा त्रास खूप अडचणीचा व वेदनादायी असतो. या सगळ्या कारणांमुळे फ्रीजमधील थंड पाणी पिणे टाळलेलेच उत्तम. पाणी पिण्याबाबत जरा नियम पाळले तर आपल्याला दुष्परिणामांपासून बचावता येईल.

No comments:

Post a Comment