Wednesday, June 26, 2019

जत मध्ये २९ रोजी रक्तदान शिबिर व सत्संग कार्यक्रम


जत,(प्रतिनिधी)-
संत निरंकारी चँरिटेबल फौडेशन  (दिल्ली)  शाखा जतच्यावतीने साई प्रकाश मंगल जत येथील  कार्यालय येथे सकाळी 10 ते 3 या वेळेमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी विद्युतनगर  येथे सत्संग मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते पापा कुंभार यांनी दिली.

रक्तदान शिबिर झाल्यानंतर सायंकाळी जतचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत(पापा) कुंभार यांचे वडील विठ्ठलराव कुंभार याच्या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त संत निरंकारी मंडळाचे युवा प्रचारक अविनाश जाधव (वाई)  यांचा सत्संग मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. या सत्संग‌ कार्यक्रमाचे आयोजन जत येथील विद्युत काँलनीत साई प्रकाश मंगल कार्यालयाजवळ करण्यात आले आहे , तरी रक्तदान शिबिर व सत्संग कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे जोतिबा गोरे, संभाजी साळे,चंद्रकांत कुंभार यांनी केले.
संत निरंकारी मंडळाचे तत्कालीन सद्गुरु बाबा गुरुबचन सिंह महाराज यांचे हत्येनंतर मंडळाच्या अनुयायीनी "खुन का बदला खुन से लेंगे"असा सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे समोर बोलुन दाखवले परंतु बाबाजी म्हणाले " खुन का बदला जरुर लेंगे लेकीन रक्त नालीयोमे नहीं बहेगा इन्सान के नाडियोमे बहेगा "असा प्रेम,नम्रता, विश्वबंधुत्व,एकतेचा,अनमोल संदेश देऊन  बाबाजीनी व त्याच्या पत्नी सद्गुरु माता सविंदर हरदेव सिंहजीनी प्रथम स्वतः 24 एप्रिल 1986 रोजी रक्तदान करुन शिबीराची सुरुवात केली तेव्हापासुन आजपर्यंत 11 लाखाहुनही अधिक रक्तदान करणारे जगातील एकमेव असे मिशन आहे अशी माहिती मंडळाचे वतीने देण्यात आली.

No comments:

Post a Comment