Friday, June 28, 2019

विश्वासघात म्हणजे आत्मघात

गुरू हरगोविंदसिंहजी यांच्या अत्यंत निकटवर्तिवांपैकी एक म्हणजे पाइंदे खॉ. गुरुंना त्याच्यावर स्वतः:पेक्षा जास्त विश्वास होता. त्याचे कतृत्वं, त्याचे शौर्य या सा-यांवर गुरुजींचा अत्यंत विश्वास होता. परंतु पाइंदे खाँने याचा वेगळा अर्थ काढला आणि तो शिष्यांमध्ये गुरुजींचीच बदनामी करू लागला. शिष्यांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो कोणाचेच ऐकत नव्हता. त्यांना कळतच नव्हते, की गुरुजींना अचानक काय झाले, पाइंदे खो गुरुजींच्या इतक्या जवळचा आणि तोच त्यांची बदनामी करतोय?

शेवटी गुरुजींच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी घोषणा केली, की पाइंदे खाँला दरबारातून काढून टाकावे. यानंतर पाइंदे खाँन बंडखोरी केली आणि तो मोगलांना जाऊन मिळाला. यानंतर पाइंदे खां थेट शहाजानला जाऊन भेटला आणि त्याने हरगोविंदसिंहजी विरोधात त्याचे कान भरले. शहाजहानने मग काले खाँच्या नेतृत्वाखाली एक फौज गुरुंवर हल्ला करण्यासाठी पाठवली, जालंधरमध्ये मोगल आणि शीख सैन्याचे युद्ध झाले.या युद्धात पाइंदे
खाँ ने गुरुवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. गुरुंनी त्याचे वार चुकवत त्याला माफी मागायला सांगितली आणि असे केले तर, मी तुला माफ करेन असे आश्वासनही त्याला दिले. त्याने पुन्हा गुरुजींवर हल्ला
चढवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या फारसा परिणाम झाला नाही. गुरुजींनी त्याचा हाही वार चुकवला. त्याला पुन्हा शरण येण्याचे आवाहन केले. परंतु तो ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी गुरुजींना त्याचा वध करावाच लागला.

No comments:

Post a Comment