Tuesday, June 4, 2019

लायन्स क्लबच्या विभागीय अध्यक्षपदी राजेंद्र आरळी

जत,(प्रतिनिधी)-
जत येथील राजेंद्र आरळी यांची लायन्स क्लबच्या विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी श्री.आरळी यांनी लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांची क्षेत्रीय अध्यक्षपदी देखील निवड झाली होती. आता त्यांची विभागीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. ३२३ डी १ या लायन्स क्लबच्या विभागात  आठ क्लब  येतात.  या कार्यक्षेत्राची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment