Wednesday, June 5, 2019

जत तालुक्यातील वृक्षतोड थांबवण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. दररोज 50 ट्रक वृक्ष तोडून सांगली, इचलकरंजी, विजापूर, पंढरपूर येथे जात असून यामुळेच तालुक्यात भीषण दुष्काळाची अवस्था निर्माण झाली आहे. ही वृक्षतोड थांबल्याशिवाय जत तालुक्याचा दुष्काळ हटणार नाही, अशी मागणी होत आहे.

जत तालुका सांगली जिल्ह्यातील शेवटचा तालुका आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाशी दोन हात करत येतील जनता जगत आहे. मात्र तालुक्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. महाराष्ट्र शासन तालुक्यातील वृक्षसंवर्धनाचे काम करत आहे. मात्र त्याचे संवर्धन वन विभागाकडून केले जात नाही. वन विभागाच्याआशीर्वादाने तालुक्यात दररोज 50 ट्रक लाकूड बाहेरगावी जात असताना वन विभागाचे अधिकारी मात्र त्याला हिरवा कंदील दाखवत आहेत. बंदीचे आदेश असतानाही वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपये या वृक्ष लावण्यावर खर्च होत असून याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
 सध्या जत तालुक्यात 112 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी तालुक्याच्या पूर्व भागास पाणी देऊन पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र प्लॅन तयार करून टँकरवर होणारा कोट्यवधी रुपयांचा चुराडा थांबवावा, अशी मागणी होत आहे. मंजूर असलेली ही योजना सध्या रखडलेली आहे. कुंभारीसह काही भागातम्हैसाळचे पाणी आले आहे. मात्र पूर्वभागाची परिस्थिती बिकट आहे. या भागातील शेतकर्यांनी पाच दिवसाचे उपोषण करून उमदी ते सांगली पायी दौरा केला. पूर्वभागातील गावाला पाण्ी द्यावे, अशी मागणी केली. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. अनेक वेळा आंदोलने झाली. अनेक मोर्चे निघाले. मात्र पूर्वभागातील गावे मात्र पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. जत तालुक्यात हजारो हेक्टर जमीन पडीक आहे. या भागास पाणी दिले तर ते संपूर्ण ओलिताखाली येणार असून तालुक्यात जनावरांना चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक सक्षम होणार आहेत. यासाठी शासनाने प्रामुख्याने काम करण्याची गरज आहे.
वर्षानुवर्षे होणारा खर्च पाहता या तालुक्याच्या प्रत्येक गावातील विशेष बाब म्हणून या दुष्काळी तालुक्याला पावसाचे पाणी सोडावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. वृक्षतोड करणार्यांवर गुन्हे दाखल करा. शहरात तालुक्यातील अनेक गावात लाकूड कापण्याच्या गिरण्या आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात लिंब, जांभूळ, चिंच आदी लाकडे कापली जातात, कोळगिरीसह अनेक गावातील मोठे व्यापारी सांगली, इचलकरंजी, विजापूर, पंढरपूर या ठिकाणी वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात लाकूड घेऊन जातात. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी याची दखल घेऊन तालुक्यातील वृक्षतोड बंद करावी, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment