Saturday, June 22, 2019

सोन्याळमध्ये मोफत चारा वाटप


जत,(प्रतिनिधी)-
 विश्व हिंदू परिषदेमार्फत सोन्याळ (ता. जत) येथे मोफत चारा वाटप करण्यात आला. यावेळी आरएसएस सांगली जिल्हाप्रमुख विलास चौथाई, राजाभाऊ पडसलगीकर, क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंग राजे, भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र आरळी, भाजपचे जत तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

जत तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. पावसाळा येऊनही पाऊस पडत नाही. त्यामुळे जत तालुक्यातील माणिकनाळ, सोरडी, सोन्याळ, बिळूर, माडग्याळ, कोळीगिरी या गावात चार्याचे वाटप राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत केले आहे. सोन्याळ येथे विहिंपच्यावतीने 10 टन ओला, तर 3 टन सुक्या चार्याचे वाटप करण्यात आले. विलास चौथाई म्हणाले, जत तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. मात्र दुष्काळचा सामना सरकारने चांगला केला आहे. मात्र पावसाने दांडी दिल्याने दुष्काळ पडला आहे. दुष्काळी जनावरांचे हाल पाहून आम्ही आद्यकर्तव्य म्हणून चारावाटप करत आहोत. ज्या मुलांना चांगले मार्क व गुणवत्ता असेल तर आर्थिक पाठबळ शिक्षणासाठी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

No comments:

Post a Comment