Thursday, June 27, 2019

म्हैसाळ पाणीप्रश्नावर आ. जगताप यांचा विधानसभेत आवाज

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील म्हैशाळ योजनेपासून वंचित असणाऱ्या 48 गावांचा समावेश तत्काळ म्हैशाळ योजनेत करावा, अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी विधानसभेत  केली. आमदार जगताप यांनी विधानसभेत म्हैसाळच्या पाणी प्रश्नावर जोरदार आवाज उठविला. दुष्काळी भाग असल्याने प्राधान्य  देण्याची गरज असल्याचे सांगितले.

    आमदार  जगताप यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरच्या तासात दुष्काळी जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेपासून वंचित असणाऱ्या 48 गावांचा समावेश म्हैसाळ योजनेत करावा अशी मागणी केली. यावेळी ते म्हणाले, जत पूर्व भागातील 48 गावात पिण्याचा पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणी प्रश्न सोडविण्याकरिता या गावातील जनतेने अनेक वेळा रस्ता रोको आंदोलने ,सांगलीपर्यंत पायी पदयात्रा काढलेली आहे. जनतेच्या भावनेचा विचार करावा. अशा टंचाईग्रस्त गावांचा पाणी प्रश्न शासनाने प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे .या गावांचा समावेश करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे. तरी या गावांचा तातडीने सर्वेक्षण करावा. ही योजना तत्काळ मंजूर करावी व दुष्काळी भागातील जनतेला दिलासा द्यावा.
    यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले जत तालुक्यातील पाणीप्रश्नावर सरकार गांभीर्याने विचार करीत आहेत. पाण्याची उपलब्धता पाहून सर्वेक्षण करीत असल्याचे स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment