Sunday, June 9, 2019

जतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जत,(प्रतिनिधी)-
लग्नाचे आमिष दाखवून जत येथील सचिन चंद्रकांत विटेकर याने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीने जत पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत जत पोलिसांनी सांगितले की, जत शहरातील आंबेडकर नगर येथे सचिन विटेकर हा राहण्यास आहे. मागील दोन वर्षांपासून या दोघांची मैत्री असून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

सचिन विटेकर याने चार जून रोजी पीडित मुलीस फोन करून आपण दोघे पळून जाऊन लग्न करू ,असे आमिष दाखवले. त्याच रात्री दोनच्या सुमारास ते दोघे मोटारसायकलने सांगलीस आले. सांगलीत सचिनने पीडित मुलीस मामा मिथुन गोंधळे यांच्या घरी ठेवले. मामा गोंधळे बाहेर गावी गेले होते. सात जूनला ते परत आले. त्यांनी पीडित मुलीस व सचिन यास येथे का आला आहात, अशी विचारणा केली. शिवाय मुलीचे वयदेखील कमी असल्याने मामा गोंधळे यांनी जतला फोन करून सचिनच्या घरी सांगितले. दरम्यानच्या काळात सचिनने पीडित मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. सात जूनला पीडित मुलीला जतला मोटारासायकलने आणून सोडले आणि स्वतः सचिन पसार झाला. काल पीडित मुलीने जत पोलिसांत सचिन विटेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment