Sunday, June 2, 2019

चारा छावण्यांच्या परवानगीसाठी तालुकास्तरावर निर्णय:मंत्री सदाशिव खोत

जत,(प्रतिनिधी)-
 जत व कवठेमहांकाळसह जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून  घेण्यासाठी खासदार संजय पाटील आणि मी थेट बांधावर जाण्याचा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी युती सरकार ठामपणे उभे असून आता चारा छावण्याच्या परवानगीसाठी तालुकास्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी जत तालुक्यातील अनेक भागात दौरा करताना दिले.

तालुक्यातील लोहगाव, आवंढी, अंतराळ या ठिकाणच्या चारा छावण्यांना भेटी दिल्या. व लोहगावला आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना मंत्री खोत म्हणाले,चारा छावण्यावरील जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्यावतीने पाण्याचे टँकर उपलब्ध केली जातील, असे स्पष्ट करताना त्यांनी १९७२ पेक्षाही  हा दुष्काळ भयंकर असून शासकीय अधिकाऱयांनी ऑफिसमध्ये वेळेपेक्षा  आता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी थेट बांधावर जाण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
 आक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आपत्ती निवारण निधीतून बागायती क्षेत्र व कोरडवाहू शेतीसाठी अनुक्रमे ६८०० रुपये व तेरा हजार रुपये तसेच फळबागांना १८५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत.केंद्र सरकारने पाण्याच्या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी स्वतंत्र असे जलमंत्रालय स्थापन करण्याची ऐतिहासिक निर्णय  प्रधानमंत्री मोदी सरकारने घेतला  आहे. त्यामुळे  येनाऱ्या काळात  जत तालुक्यातील सर्व प्रकारच्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे.
     अमृतवाडी येथील चारा छावणीचे उदघाटन मंत्री खोत यांच्याहस्ते झाले. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी चारा छावण्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.  यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप,माजी सभापती प्रकाश जमदाडे, नगरसेवक उमेश सावंत,जि.प.सदस्य सरदार पाटील, सुनील पवार,सभापती सुशीला तावंशी, लक्ष्मण बोराडे, विजय ताड, नगरसेवक प्रमोद हिरवे,संतोष मोटे, बसवराज चव्हाण, प्रकाश माने, आण्णा भिसे, रासपचे अजित पाटील ,प्रमोद सावंत, अजिंक्य सावंत,आप्पा शिंदे,राहुल मोरे, उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे ,तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment