Thursday, June 6, 2019

मिरवाड तलावात पाणी सोडण्याची मागणी

आश्वासनानंतर रस्ता रोको मागे
जत,(प्रतिनिधी)-
 (मिरवाड ता. जत) येथील तलावात म्हैसाळचे पाणी सोडावे, या मागणीसाठी डफळापुर येथे जत-सांगली मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  तब्बल दीड तास शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला  होता. गुरुवार बाजाराचा दिवस असतानादेखील मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गर्दी झाल्याने पूर्णपणे बंद झाला होता.  यावेळी शेतकऱ्यांनी बैलगाड्या ,मेंढरे रस्त्यावर आणून  उतरली होती. 

म्हैसाळ -देवनाळ कालव्यातून पाणी सोडण्यात यावे ,'या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल व त्या संदर्भात सांगली येथील वारणा वारणाली म्हैशाळ योजनेच्या कार्य कार्यालयात वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकरी  आंदोलकांची बैठक घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन पाटबंधारेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या रस्ता रोको मध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश, खराडे कॉम्रेड हणमंत कोळी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक  अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,  अखिल भारतीय किसान सभा जिल्हा सेक्रेटरी दिगंबर कांबळे, अशोक सवदे, विजय चव्हाण,  संजय भोसले, अंबादास कुंभार, सुभाष गायकवाड,अतुल शिंदे, गौस मकानदार आदींसह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

फोटो ओळ- ( डफळापूर ता.जत येथे शेतकऱ्यांनी मिरवाड तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे यासाठी रास्ता रोको आंदोलन केले.)

No comments:

Post a Comment