Thursday, June 13, 2019

पाच वर्षांपासून पोलीसांना चकवा देणाऱ्या दोघा आरोपींना अटक

 जत,(प्रतिनिधी)-
पांढरेवाडी येथील गंभीर मारामारी प्रकरणात गेल्या पाच वर्षापासून जत पोलिसांना हवे असलेले दोन आरोपींना जत पोलिसांनी शिताफीने पकडले.

दिनांक १७जुलै २०१४ रोजी दरीबडची गावात व जतमध्ये बसवेश्वर चौकात बिराप्पा भाऊसा तांबे रा.पांढरेवाडी ता. जत यांना झालेल्या गंभीर मारहाणीबाबत जत पोलिस ठाण्यात दिनांक १८जुलै २०१४ रोजी गंभीर मारहाण करणे, बेकादेशीर जमाव जमवणे, शिवीगाळ, दमदाटी करणे इ बाबत एकूण नऊ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील सात आरोपींना पोलीसांनी यापूर्वी अटक करण्याबाबत  न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. परंतु यातील दोन आरोपी  विनोद नामदेव थोरात व  बिराप्पा नामदेव थोरात दोघे रा. पांढरेवाडी ता. जत हे गुन्हा घडलेपासून परागंदा झाले होते.
जत पोलीसांनी त्यांना मिळालेल्या माहीतीचे आधारे दोन्ही आरोपींना शिताफीने पकडून, गुन्हयात त्यांना अटक करून आज रोजी न्यायालयात हजर केले. सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनिल माने, पोलिस हवालदार  राजेंद्र पवार (चालक), पोलीस नाईक विनायक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद चौगुले, पोपट घागरे यांनी पार पाडली आहे.

No comments:

Post a Comment