Sunday, June 2, 2019

कुंभारीत साडेचार लाखांची चोरी

जत,(प्रतिनिधी)-
 कुंभारी ता.जत येथील नानासो तुकाराम जाधव यांचे राहते घर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून 4 लाख 35 हाजार 100 रूपयाचा मुद्देमाल पळविला.घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

अधिक माहिती अशी, कुंभारी हद्दीत शेतात राहणारे नानासो जाधव हे उन्हाचा तीव्र धग असल्याने घराबाहेर झोपले होते.तर त्यांचा मुलगा व सालगडी घराच्या छतावर झोपले होते.घराला बाहेरून कडी लावली होती.मध्यरात्री चोरटे कडी काढून घरात घुसले.आतील कपाटे,तिजोरीतील 21तोळे सोन्याचे दागिने,600 ग्रँम चांदीचे ताट,गणेश मुर्ती,पंजन,अंगट्या व तिजोरी व नानासो यांच्या पँटच्या खिशातील पाकिटातील रोख 22 बाजार 800 रूपये असा 4 लाख,35 हाजार 100 रूपयाचा मुद्देमाल पळविला.चोरट्यांनी घरातील साहित्य विस्कटून टाकले.उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे तालुका भरातील नागरिक घराबाहेर झोपत आहेत.कुंभारीतील घटनेने भितीचे वातावरण पसरले आहे.पोलीसांनी गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
(कुंभारी ता.जत येथील नानासो जाधव यांच्या घरातील चोरट्यांनी विस्कटलेले साहित्य.)

No comments:

Post a Comment