Monday, June 24, 2019

देशातील काळा पैसा ३४ लाख कोटींवर

१९८0 सालापासून २0१0 पयर्ंतच्या ३0 वर्षांच्या कालावधीत २४६.४८ अब्ज डॉलर (१७,२५,३00 कोटी रुपये) ते ४९0 अब्ज डॉलर (३४,३0,000 कोटी रुपये) एवढा काळा पैसा भारतीयांकडून परदेशात पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयपीएफपी, एनसीएईआर आणि एनआयएफएम या तीन बड्या संस्थांनी संशोधन करून प्रसिद्ध केलेल्या अहवालात सदर माहिती देण्यात आली आहे.

बांधकाम, खाण, औषधे, पान मसाला, गुटखा, तंबाखू, व्यापारी माल, सोने-चांदी, चित्रपट आणि शिक्षण अशा क्षेत्रात सर्वाधिक काळा पैसा असल्याचा निष्कर्ष या तीन संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आला आहे, अशी माहिती आर्थिक व्यवहारांच्या स्थायी समितीने सोमवारी लोकसभेत दिली. काळा पैशाच्या साठवणुकीवर किंवा त्याच्या एकत्रिकरणाचा कोणताही अंदाज बांधू शकत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या तर्कावरून काळ्या पैशाबाबतची ठोस कार्यपद्धती सांगितली जाऊ शकत नाही. यासंदर्भात मांडण्यात आलेल्या गोष्टी मूलभूत ठोकताळे आणि त्यातील छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून आहेत, असे 'देशातील आणि देशाबाहेरील काळ्या पैशाची सद्य:स्थिती आणि त्याचे विेषण' नामक अहवालात मांडण्यात आले आहे. या अहवालात मांडण्यात आलेले अंदाज कोणत्याही एका प्रकारच्या तपास पद्धतीने समोर आलेले नाहीत. त्याचप्रमाणे यातील तपास पद्धती आणि दृष्टिकोन याविषयी एकमतही नाही, असेही यात म्हटले आहे. नॅशनल काऊंसिल ऑफ अप्लाइड इकनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) यांच्या अहवालानुसार, १९८0 ते २0१0 या तीस वर्षांमध्ये भारतीयांनी परदेशात सुमारे २६,८८,000 लाख कोटींपासून ते ३४,३0,000 कोटी रुपये पाठवले. तर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शिल मॅनेजमेंट (एनआयएफएम) या संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार, १९९0 ते २00८ या कालावधीत १५,१५,३00 कोटी रुपये भारतीयांनी परदेशात पाठवले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी अँण्ड फाइनान्स (एनआयपीएफपी) या संस्थेच्या मते, १९९७-२00९ या कालावधीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) 0.२ ते ७.४ टक्के काळा पैसा भारतीयांकडून परदेशात पाठवण्यात आला.

 

No comments:

Post a Comment