Sunday, June 23, 2019

ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच सन्मान योजना:मुख्यमंत्री

पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच सकारात्मक असून ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून पुढच्या महिन्यापयर्ंत पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या पत्रकारांना याचा लाभ मिळेल, अशी ग्वाही देतानाच म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसेच पुणे प्रेस क्लबसाठीही जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील पुणे र्शमिक पत्रकार संघाच्या सभागृहात पुणे पत्रकार संघाच्या सन १९४0 ते २0१९ या आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणार्‍या स्मृतिचित्रे या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाले.

आपल्या देशात अनेक संस्था निर्माण झाल्या, त्या मोठय़ा झाल्या. मात्र त्याच्या इतिहासाचे जतन करण्याचे काम आपल्याकडे फारसे झाले नाही. परदेशात मात्र संस्थांच्या इतिहासाचे योग्यप्रकारे जतन करण्यात येते. संघर्षाच्या काळात तसेच पुढील पिढीसाठी हा ऐतिहासिक दस्ताऐवज उपयुक्त ठरतो. पुणे र्शमिक पत्रकार संघाला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा ऐतिहासिक वारसा आहे. हा सर्व इतिहास संग्रहीत करून तो चित्ररूपाने प्रदर्शित करण्याचा पत्रकार संघाचा हा उपक्रम अभिनव आहे. पत्रकारिता व्यवसायासमोर आज अनेक अडचणी आहेत, त्यातच नवमाध्यमांच्या उदयाने हे क्षेत्र अधिकच आव्हानात्मक बनले आहे.
अशा परिस्थितीत पत्रकारांच्या कल्याणासाठी त्यांचा समावेश शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये करण्यात आला आहे. याचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार असल्याचे सांगत पत्रकारितेला अधिक प्रगल्भ करण्यासाठी पत्रकार संघाने पुढाकार घेऊन विशेष अभ्यासदौरे आणि अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
खासदार गिरीश बापट म्हणाले, पुणे र्शमिक पत्रकार संघाचा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात मोठा वाटा आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आधार आहे. समाजाच्या दुख:ला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार करत असतात. पुणे र्शमिक पत्रकार संघाचा इतिहास आदर्शवत असून पुणे प्रेस क्लबच्या उभारणीत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर वारीत सहभागी होणार्‍या वारकर्‍यांना आणि नागरिकांना वारीच्या संदर्भात अद्ययावत माहिती मिळावी, महत्त्वाचे फोन नंबर उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आषाढी वारी २0१९ या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

No comments:

Post a Comment