Wednesday, June 5, 2019

परमात्मा जीवनामध्ये आल्यास जीवन सुखमय होईल: कुलकर्णी


जत,(प्रतिनिधी)-
 जीवन जगत असताना ज्यावेळी आपणाला दुःख, संकट निर्माण होते, त्यावेळी आपणाला परमेश्वराची आठवण येते. परंतु ज्यांच्या जीवनामध्ये परमात्मा आला, या निराकार प्रभू परमात्म्याची ओळख झाली, त्यावेळी आपले जीवन सुखमय होईल, असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळाचे युवा प्रचारक ओंकार कुलकर्णी यांनी केले. जत येथे आयोजित साप्ताहिक सत्संग कार्यक्रमात ते बोलत होते.

कुलकर्णी पुढे म्हणाले की, परमात्मा पूर्णत्वास नेण्यास निरंकारी मंडळ शिकविते. कायमच परमात्म्याची आठवण करून जीवन जगल्यास संसारामध्ये दुःख येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. परमेश्वराने आपणाला अनमोल असा जन्म दिलेला आहे. हा जन्म फुकट वाया न घालवता संसारी जीवनाला भक्तिमार्गाची सांगड घातल्यास आपल्या जीवनाचे कल्याण होईल. कार्यक्रमात 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सूत्रसंचालन प्रकाश माने यांनी केले. नियोजन जत ब्रँचमुखी जोतिबा गोरे, सेवादल संचालक संभाजी साळे, संज्योती साळुंखे यांच्यासह सेवादार संत महापुरुष यांनी केले.

No comments:

Post a Comment