Sunday, June 9, 2019

अमृतानंद महाराज यांना अमेरिकेच्या विद्यापीठाची पीएचडी

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बालगाव येथील मठाचे स्वामी अमृतानंद महाराज यांना योग व योगाभ्यासमधील  अतुलनीय कामगिरीबद्दल अमेरिकेच्या एका विद्यापीठाने त्यांना पीएचडी जाहीर केली आहे.  नेपाळ येथील काठमांडू येथे  होणाऱ्या एका खास समारंभात ही पदवी त्यांना बहाल करण्यात येणार आहे.

   'योगा युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका ' या विद्यापीठाने स्वामी अमृतानंद महाराज यांना पीएचडी जाहीर केली आहे. गतवर्षी 21 जूनला बालगाव येथे एक लाख समुदायाच्या उपस्थितीत ' योगा आणि योगासने' करण्याचा विक्रम करण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. या योगा कार्यक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'सह अन्य चार विक्रमांची नोंद झाली आहे. ते महाराष्ट्र आणि कर्नाटकात योगाचे धडे आणि मार्गदर्शन देत असतात. याशिवाय सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग असतो. ग्रामीण भागात स्वच्छता अभियान राबविण्याबाबत त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. 

No comments:

Post a Comment