Wednesday, July 3, 2019

जि. प. कर्मचार्‍यांची माहिती 'एका क्लिक'वर

सरकारी कर्मचारी म्हणून रुजू झाल्यापासून नवृत्तीपयर्ंतची सगळी माहिती देणारी गोष्ट म्हणजे 'सर्व्हिस बुक' आहे. अनेकवर्षे त्यात नोंदी होत राहतात आणि अनेकदा सर्व्हिस बुकची परिस्थिती जुन्या पोथ्यांसारखी होते. त्यामुळे हे 'सर्व्हिस बुक' आता ऑनलाइन केले जात आहे. नागपूर जि. प. तून हा पथदश्री प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पात नागपूर जि. प. ने आगेकूच केली असून, पडताळणीची तब्बल ९९ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक प्रणाली ऑनलाइन केल्या आहेत. यात निविदा प्रक्रियेपासून सेवार्थ प्रणालीपयर्ंत सगळ्या प्रणाली ऑनलाइन केल्या जात आहे. आता 'सर्व्हिस बुक' सुद्धा ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूर जि. प. तून या योजनेचा शुभारंभ होणार आहे. या प्रणालीमुळे कर्मचार्‍यांच्या सेवेचा रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
हा प्रकल्प आता राज्यभर राबविला जात आहे. सर्वच जि. प. मधील कर्मचार्‍यांचे 'सर्व्हिस बुक' आता ऑनलाईन होत आहे. यासाठी सर्वच कर्मचार्‍यांची माहिती ऑनलाईन भरली जात आहे. नागपूर जि. प. मध्ये एकूण ७९९१ कर्मचारी आहेत. यातील ७९४१ कर्मचार्‍यांचे 'ऑनलाईन सर्व्हिस बुक' सुरू झाले आहे. यातील ७९१६ कर्मचार्‍यांचे 'सर्व्हिस बुक' ची पडताळणीसुद्धा झालेली आहे. नागपूर जि. प. तील ९९.0६ टक्के पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, हे विशेष. पडताळणी प्रक्रियेत नागपूर प्रथम क्रमांकावर आहे. ७ कर्मचार्‍यांच्या 'सर्व्हिस बुक' ची अद्याप पडताळणी शिल्लक असून ६८ कर्मचार्‍यांची माहिती अद्याप ऑनलाईन झालेली नाही. नागपूर खालोखाल नाशिक जि. प. मध्ये पडताळणीची टक्केवारी ९८.६२ टक्के इतकी आहे.
राज्यातील जि. प. मध्ये एकूण २ लाख ८५ हजार ९८0 कर्मचारी आहेत. त्यातील १ लाख ८४ हजार ५३१ कर्मचार्‍यांचे 'ऑनलाईन सर्व्हिस बुक' सुरू झाले आहे. त्यातील ६0 हजार २६१ कर्मचार्‍यांच्या माहितीची पडताळणी पूर्ण झाली आहे. ४९४३ कर्मचार्‍यांची पडताळणी प्रक्रिया प्रलंबित आहे. २ लाख २१ हजार १ कर्मचार्‍यांची पूर्ण माहितीच भरण्यात आलेली नाही

No comments:

Post a Comment