Monday, July 29, 2019

सलीम गवंडी यांची अल्पसंख्याक कल्याण समितीच्या जिल्हा सदस्यपदी निवड

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका मुस्लिम समाज संघटना व कॉन्ट्रॅक्टर असोशिअनचे अध्यक्ष सलीम गवंडी यांची महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक कल्याण समितीच्या जिल्हा सदस्य पदी नुकतीच निवड झाली आहे.

जत तालुक्यातील मुस्लिम समाजाचे नेते म्हणून ओळख असलेले सलीम गवंडी सामाजिक कार्यात सतत कार्यरत असतात. विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर असून गोरगरीब लोकांना मदत व्हावी,हा त्यांचा उद्देश असतो. त्यांना अल्पसंख्याक कल्याण समितीच्या सांगली जिल्हा सदस्यपदी निवड झाल्याचे पत्र  उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांचा हस्ते देण्यात आले.  यावेळी सलीम गवंडी यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र रेल्वे बोर्डचे संचालक प्रकाश जमदाडे, रमजान उर्फ बंटी नदाफ , लियाकत जमखंडीकर , जब्बार मुल्ला , शकील मुल्ला, जत    तालुका फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष नूर इनामदार , दीपक पाच्छापूरे व मस्जिद  सनदी उपस्थित होते. यानिमित्ताने त्यांचा विविध मान्यवर मंडळींनी सत्कार केला.इत्यादी व जत मधील जल्लोष व अभिनंदन करतानाचे क्षण

No comments:

Post a Comment