Tuesday, August 27, 2019

समग्र शिक्षा अंतर्गत शाळा अनुदानात वाढ करण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
समग्र २०१८-१९ वर्षात समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त अनुदान सुरु करण्यापूर्वी शासकीय आणि स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या शाळांना- शाळा अनुदान, शिक्षक अनुदान आणि देखभाल दुरुस्ती अशा तीन उपशीर्षानिहाय अनुदान दिले जात होते. मागील वर्षी २९ जून २०१८ नुसार निर्गत अनुदानाची तरतूद अत्यंत अपुरी होती. त्यामुळे या अनुदानात वाढ करण्याची मागणी सांगली जिल्हा शिक्षण समितीचे नेते दयानंद मोरे, दीपक कोळी यांनी केली आहे.

उमदी येथे 'एक गांव, एक गणपती' योजना राबवण्याचा निर्णय

जत,(प्रतिनिधी)-
जिल्ह्यातील महापूर वतालुक्यातील दुष्काळ याची भान राखत उमदीतील ग्रामस्थ एक गावएक गणपती संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. उमदी पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित केलेल्या 'एक गांव एक गणपती' संकल्पना व  शांतता बैठकीत उमदी शहरात एकच गणपती बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. उमदी येथे सुमारे 15 हून अधिक गणेश मंडळ आहेत उमदीतील सर्वच गणेश मंडळाने स्वतः लेखी संमती देऊन एकच गणपती बसविण्यास पाठींबा दर्शविला.

राजे रामराव महाविद्यालयाने पूरग्रस्त ढवळी गावाला मदत

जत (प्रतिनिधी )-
वर्षानुवर्षे पडणारा भीषण दुष्काळ आणि या भागात राहणाऱ्या व मुलभूत सुविधेपासुनही कोसो दुर असणार्‍या जत तालुक्यातील जनता असे विदारक चित्र असताना याच तालुक्यातील एका वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्र येऊन पूरग्रस्त  ढवळी या मिरज तालुक्यातील गावात जाऊन एकदिवसीय स्वच्छता अभियान राबविले व जीवनोपयोगी साहित्याचे वाटप आणि आर्थिक मदत करुन सामाजिक भान जपले. 

Tuesday, August 20, 2019

अमिताभ आणि यकृताबाबत गैरसमज


वाचकांचे पत्र
प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतेच आपले यकृत 75 टक्के निकामी झाले असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे, आणि हे सांगताना त्यांनी आपण अगदी ठणठणीत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय मला टीबी आणि हेपेटायटीस-बी झाल्याचे सांगताना वाईट किंवा अपमानास्पद वाटत नाही, असेही स्पष्ट केले आहे. टीबीबद्दल जागरूकता संदेश देताना ते स्वतःचे आपले उदाहरण देत असतात.

Monday, August 19, 2019

रांगोळीचे महत्त्व


सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्सायनाने लिहिलेल्या 'कामसूत्रया ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्यात अशा चौसष्ट कलांमध्ये 'रंगोलीया कलेचा समावेश होतो. रांगोळी म्हणजे रंगांच्या साहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला फार महत्त्व आहे. रांगोळीचा उल्लेख रामायणमहाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. भारतासहित अनेक देशांमध्ये या कलेचा प्रसार झालेला आहे. हिंदू धर्मात दैनंदिन कार्यात रांगोळीचे महत्त्व तर आहेचपण धार्मिक कार्य व सण यामध्ये तिचे असाधारण असे महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. देवघरअंगणउंबरठा तसेच तुळशीजवळ रांगोळी काढली जाते. साधारणत: रंगोलीमध्ये स्वस्तिकगोपद्मशंखचक्रगदाकमळाचे फूलबिल्वपत्रलक्ष्मीची पावलेसूर्य देवेतेचे प्रतीकश्रीकासवआदी मांगल्यसूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.

श्रावण : सणांचा राजा

निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला महत्त्व आहे. श्रावण महिना म्हणजे 'सणांचा राजा' असे म्हटले जाते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन आणि गोपाळकाला या सणांपासून सार्‍याच उत्सवाची रेलचेल सुरू होते. याच महिन्यात आपल्या शेतीप्रधान भारत देशातील लोकांची शेतीची कामेही संपलेली असतात. त्यामुळे महिलांना कामातून थोडासा विसावाही मिळतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या महिन्यात मंगळागौर खेळली जाते. 'एका फुलाच्या चार पाकळ्या, पुजिते मंगळा गौर, दिसाया जरी सार्‍या निराळ्य़ा एकाच रंगाचा सूर, पुजिता मंगळा गौर' ही मंगळागौर देवीच्या आरतीपासून मंगळागौरीच्या पूजेस सुरुवात केली जाते. पूर्वी आपल्याकडे लहान वयातच लग्न केली जात होती. शेतातील कामे संपल्यानंतर नागपंचमीनिमित्त भाऊ सासुरवाशिणीला माहेरी न्यावयास येई. त्यानंतर एकामागून एक येणार्‍या सणांमुळे त्या मुलीला १५ ते २0 दिवस माहेरी राहण्याची मुभाही मिळत असे. त्यावेळी हा मंगळागौर खेळ खेळला जात असे. तीच प्रथा आजही सुरू आहे. मात्र, हल्ली आपल्या मुली कामाला जाणार्‍या असतात. त्यांच्याकडे पाच वर्षे मंगळागौर खेळण्याएवढा वेळ आणि कामातून सुटीही मिळत नाही. त्यामुळे पहिल्याच वेळेस मंगळागौरीचे उद्यापनही केले जाते. मात्र, ते अतिशय उत्साहाने आणि दोन्ही घरच्या मंडळींसोबत केले जाते.

संत निरंकारी मंडळाच्यावतीने मुक्ती पर्व दिवस साजरा


डफळापूर जिल्हा परिषद शाळा नं.2 मधील गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव

जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर येथील जि.प. मुलींची शाळा नं. 2 मधील  विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी मध्ये प्रांजली अभिजित चव्हाण, जिल्हा गुणवत्ता यादीत ३८  वा क्रमांक, तसेच केंद्रात दुसरा ते चौथा क्रमांक जान्हवी संदीप माळी, प्राजक्ता हणमंत कोळी, ऐश्वर्या आपासाहेब चव्हाण, तसेच साक्षी सचिन चव्हाण केंद्रात सहावी आली.

जत अंजुमन उर्दू हायस्कूल विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांना मदत

जत,(प्रतिनिधी)-
  येथील मुस्लिम समाज प्रबोधन संस्था संचालित अंजुमन उर्दू हायस्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही  वातावरणात साजरा करण्यात आला. प्रसंगी महाराष्ट्र शासन  अल्पसंख्यांक समाज कल्याण समितीचे सदस्य सलीम गवंडी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला .राष्ट्रीय ध्वज तिरंग्याला मनवंदना देत राष्ट्रगीत सादर करण्यात आला तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले.

Saturday, August 17, 2019

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता

जत,(प्रतिनिधी)-
आगामी राज्य विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीसाठी पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. शासन आणि निवडणूक आयोगाने तशी पूर्ण तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

Friday, August 16, 2019

महापुराने सांगलीची लागली वाट

जत,(प्रतिनिधी)-
सांगलीला 2005 च्या महापुरापेक्षा मोठा तडाखा बसला आहे. या पुरामुळे सांगलीची अक्षरशः वाट लागली आहे. खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अनेकांचा उद्योग,व्यवसाय, रोजगार बुडाला आहे. अनेकांची घरं उदवस्त झाली आहे. धोके निर्माण झाले आहेत. सांगलीकरांना सावरायला वेळ लागणार आहे. सांगलीकरांना राज्य भरातून मदतीचा ओघ सुरू आहे, ही दिलासा देणारी बाब असली तरी महापुरात वैयक्तिक नुकसान झालेल्या पूरग्रस्त लोकांसाठी मोहीम उघडण्याची गरज आहे.

Wednesday, August 14, 2019

सीबीएसई बोर्डाने एससी, एसटी प्रवर्गासाठी फी वाढ केल्याप्रकरणी जत 'बसपा'वतीने निषेध

जत,(प्रतिनिधी)-
तुघलकाबाद (दिल्ली) येथील ७०० वर्षे पुरातन संत शिरोमणी रोहिदास महाराज मंदिर पाडल्याप्रकरणी व CBSE बोर्डाने SC व ST या प्रवर्गातील १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची मनमानी रितीने २४ पटीने फी वाढ केल्याच्या निषेधार्थ बसपा जत विधानसभाच्या वतीने  तहसिलदार  यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

निरंकारी भक्तानी केली पुरग्रस्त गावाची साफसफाई


जत,(प्रतिनिधी)-
संत निरंकारी चँरिटेबल  फौडेशनच्यावतीने सांगली  निरंकारी भक्तांनी पुरग्रस्त असलेल्या सांगली शहर व बहुतांश गावांमध्ये जाऊन गावाची व घरांची स्वच्छता करून माणुसकीचे दर्शन घडवित आहेत.

Tuesday, August 13, 2019

अंगणवाडी सेविका वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत

जत,(प्रतिनिधी)-
 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २0१८ मध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार वाढ जाहीर केली आहे.  पण अद्याप ही वाढ महाराष्ट्रातील सेविकांच्या खात्यावर झालेली नाही.  मानधन वाढीसाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली आहेत,मात्र अजूनही शासनाला पाझर फुटत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. साहजिकच मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांना प्रतिक्षाच करावी लागत आहे.

Monday, August 12, 2019

स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थीच संचमान्येसाठी ग्राह्य धरणार!

जत,(प्रतिनिधी)-
शैक्षणिक सन २0१९-२0 साठी राज्यातील प्रत्येक शाळेला त्यांचे स्टुडंट पोर्टल पूर्ण करण्याची डेडलाईन जवळ आली आहे. २५ ऑगस्टपर्यंत स्टुडंट पोर्टलवर असणारे विद्यार्थीच यावर्षीच्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती प्राप्त आहे. त्यामुळे शाळांतील शिक्षक व कर्मचारी आपल्या शाळेचे स्टुडंट पोर्टल पूर्ण करण्याला प्राधान्य देत आहेत.

Sunday, August 11, 2019

ग्रंथपालांच्या मागण्यांना केराची टोपी

जत,(प्रतिनिधी)-
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने ग्रंथपालांमधील नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. वारंवार आंदोलन, बैठकीच्या माध्यमातून प्रश्न प्रकाशझोतात आणले तरी सर्व मागण्या, प्रश्न प्रतीक्षेतच असल्याचे समोर येत आहे.

शिक्षकांचे पगार कधी होणार वेळेत?

जत,(प्रतिनिधी)-
शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला करा, असा शासनाचा आदेश आहे. मात्र, तरीसुद्धा शिक्षकांचे पगार कधीच वेळेत होत नाही. माहे जुलैचा पगार अद्यापही न मिळाल्यामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पगारास विलंब करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणीही होत आहे. 

Wednesday, August 7, 2019

बेराजगार अभियंत्यासाठी 'महावितरण'चे स्वतंत्र पोर्टल

जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांना थेट लॉटरी पध्दतीने कामे मिळण्यासाठी महावितरणने आपल्या संकेतस्थळावर स्वतंत्र पोर्टल सुरू केले आहे.  महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत करण्यात येत असलेल्या दहा लाखांपर्यंतच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांपैकी ५0 टक्के कामे सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांना लॉटरी पध्दतीने वितरित करण्यात येत आहेत.

निराधार व्यक्ती,विधवांच्या मानधनात वाढ

जत,(प्रतिनिधी)-
सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक कारणांमुळे
निराधार म्हणून जगण्याची नामुष्की आलेले वृद्ध
तसेच विधवांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची मागणी केल्या अनेक वर्षांपासून होत होती. वाढ करण्याचे आश्वासनही देण्यात आले नव्हते, मात्र आता शासनाने ही वाढ मनावर घेतली असून शासनाने मुक्तांचा तसा निर्णय जाहीर केला आहे.

तालुक्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी ठप्प

शासकीय,बँकिंग सेवा विस्कळीत
जत,(प्रतिनिधी)-
आर्थिक व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी आग्रह धरीत असताना जत तालुक्यात नेहमीच खंडीत होणा-या कनेक्टीव्हीटीमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे बँका, शासकीय कार्यालयातील अधिकारी,
कर्मचारी हैराण झाले आहेत. तर ग्राहक वैतागले आहेत.इंटरनेटची पायाभूत सुविधा कमकुवत असल्याने जत तालुका ऑनलाईन व्यवहारात आजही मागासलेला राहिला आहे.

जिल्ह्यात 67 हजारहून अधिक व्यक्ती, 21 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत  सुमारे 13 हजार 259 कुटुंबांतील 67 हजार 503 लोक व 21 हजार 110 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

Tuesday, August 6, 2019

10 वीच्या मूल्यमापनासाठी पुन्हा 80:20 फार्म्युला

जत,(प्रतिनिधी) -
गतवर्षीच्या माध्यमिक शालान्त (10 वी) परीक्षेच्या निकालाची टक्केवारी घसरल्याने सर्वच स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले आहे. शाळांची निकालाची टक्केवारी घसरल्याने त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पालकांमध्ये,विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून आली. हा निकालाचा टक्का घसरण्यामागे शाळांतर्गत गुण कमी केल्याचे कारण आहे. त्यामुळे ही गुणपद्धती पुन्हा सुरूहोणार आहे.

Monday, August 5, 2019

जत येथे प्रेरणा दिवस साजरा

संत निरंकारी मंडळाचा उपक्रम
जत,(प्रतिनिधी)-
जत येथे संत निरंकारी मंडळाच्या   निरंकारी मंडळाचे पाचवे सदगुरु माता सविंदरजी हरदेव महाराज यांच्या स्मृतीनिमित्त एस. आर. व्ही .एम. हायस्कुलमध्ये प्रेरणा दिवस साजरा केला. यावेळी  शिरीष डोंगरे  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महापुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना सोडण्यासाठी 9 आगस्ट रोजी सांगलीत आंदोलन


जत,(प्रतिनिधी)-
  कृष्णा, वारणा दुथडी भरून वाहत आहेत मात्र दुसरीकडे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर हे तालुके तहानलेलेच आहेत. या तालुक्यात पाऊस आहे मात्र त्याचे प्रमाण अल्प आहे. या तालुक्यातील तलाव, ओढे, नद्या कोरड्याच आहेत त्यामुळे वाहून जाणारे प्रचंड पाणी दुष्काळी तालुक्यात सोडले तर दुष्काळी तालुक्याला वरदान ठरणार आहे. याशिवाय चारा छावण्या,  टँकरवर होणारा खर्च वाचणार आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यातच ताकारी, म्हैशाळ, विसापूर पुनदी, टेंभू व आरफळ या योजना सुरू करून दुष्काळी तालुक्यातील नदया, नाले, ओढे आणि तलाव भरून घेणे आवश्यक आहे. पण वीज बिल कुणी भरायचे हा प्रश्न उभा करून गेंड्याच्या कातडीचे प्रशासन दुष्काळग्रस्ताच्या भावनांशी खेळत आहे. माकडाच्या गोष्टीसारखे दुष्काळी जनतेचे झाले आहे.

पुराचे पाणी दुष्काळी भागाला सोडा

दुष्काळी भागाची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
सध्या सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका पोहचला असून शहरातील मारुती चौक आणि भाजी मंडई परिसरात कृष्णेच्या पुराचे पाणी पोहचले आहे. कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. आलमअट्टी धरणाचे पाणी मागे येत आहे. त्यामुळे सांगली परिसराला महापुराचा आणखी धोका वाढला आहे,त्यामुळे हेच पुराचे पाणी सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शिक्षकांना पदोन्नती व पूरक आहार मानधन मिळण्यासाठी शिक्षण सभापतींना साकडे


जत,( प्रतिनिधी)-
शासन भरतीपूर्वी सांगली जिल्ह्यात केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची पदोन्नती करण्यात यावी तसेच स्वयंपाकी मानधन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेमार्फत शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद  तम्मण्णागौडा रवि-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संघटनेच्या वतीने शिक्षण सभापती रवि-पाटील यांचा जिल्हा परिषद स्वीय निधीतून इयत्ता चौथी व इयत्ता सातवीची सन 2018-19 मध्ये डॉ. पंतगराव गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी तयारी व्हावी करिता उपक्रम राबविल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Sunday, August 4, 2019

आतातरी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चे महत्त्व समजा

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील पाणीटंचाईवर सर्वत्र चिंता आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक व्यासपीठावरून भविष्याच्या पाणी नियोजनासंदर्भात जबाबदारी निश्‍चित केली जात आहे. मात्र, भूगर्भातील पाणी पातळीची वाढ करणार्‍या रेन वॉटर हार्वेस्टिंगवर चर्चा थंड आहे. नगरपालिकेनेही यासंदर्भातील गंभीरतेने विचार केला असता तर शहराच्या वाट्याला दुष्काळाचे बघावे लागले नसते. त्यामुळे आतातरी ही रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व समजून पुढील पावसाळय़ाच्यापूर्वी शहरातील प्रत्येक घरी ही यंत्रणा कशी बसवता येईल, यावर कार्य करणे महत्त्वाचे आहे. तसे झाल्यास या शहराला कधीही पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही, अशी अपेक्षा केली जात आहे.

मुलांनी खेळायचे कुठे?

 खेळासाठी मैदाने आरक्षित करण्याची गरज;,शासनाचा पुढाकार हवा
जत,(प्रतिनिधी)-
खेळ हा शालेय जीवनातील अविभाज्य अंग आहे. खेळाने विद्यार्थ्यांच्या बुद्धीवर व आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. म्हणून तो प्रत्येक विद्यार्थ्यांनी खेळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पालकांनी आणि शाळांनीही काळजी घ्यायला हवी. पण आता शहरात तर सोडाच ग्रामीण भागात सुद्धा खेळायला मैदाने नाहीत, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे खेळासाठी मैदाने आरक्षित करण्याची आवश्यकता आहे.

Friday, August 2, 2019

माध्यमिक शिक्षक संघाचे ( फेडरेशन ) 9 ऑगस्ट रोजी संघर्षधरणा आंदोलन


जत,(प्रतिनिधी)-
राज्य शासनाचे शैक्षणिक धोरणाविषयीचे नियम हे माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेवर
अन्याय करणारे आहेत. राज्यातील शिक्षकांचे वेतन ,वेतनवाढ, विविध भत्ते , केंद्राप्रमाणे मिळावे व 4 जुलैची अधिसूचना रद्द करण्यात यावी. यासाठी माध्यमिक तसेच शासनाच्या प्रास्तविक खाजगी शाळांतील कर्मचारी सेवाशर्ती अधिनियम 1977 मध्ये मसुदा बदलास तीव्र विरोध दर्शवण्यासाठी व या  धोरणाचा निषेध करण्यासाठी शुक्रवार दि. 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी सकाळी 11 ते  दुपारी 2  या कालावधीत सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) च्या आदेशानुसार सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन ) संघर्ष धरणा आंदोलन करण्यात  आहे.

Thursday, August 1, 2019

मातंग समाजासाठी एक लाख घरे

अण्णाभाऊ साठे यांच्यावरील
टपाल तिकिटाचे प्रकाशन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वंचितांसाठीच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मातंग समाजासाठी एक लाख घरे देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

दुष्काळी भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी होणार माफ


राज्य सरकारने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. दुष्काळी भागात शिक्षण घेत असलेल्या १0 वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी तसेच प्रात्यक्षिक, गुणपत्रिका व प्रमाणपत्र शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री अँड. आशीष शेलार यांनी दिली आहे.