Monday, August 19, 2019

डफळापूर जिल्हा परिषद शाळा नं.2 मधील गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव

जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर येथील जि.प. मुलींची शाळा नं. 2 मधील  विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी मध्ये प्रांजली अभिजित चव्हाण, जिल्हा गुणवत्ता यादीत ३८  वा क्रमांक, तसेच केंद्रात दुसरा ते चौथा क्रमांक जान्हवी संदीप माळी, प्राजक्ता हणमंत कोळी, ऐश्वर्या आपासाहेब चव्हाण, तसेच साक्षी सचिन चव्हाण केंद्रात सहावी आली.

      सांगली जिल्हा परिषदेमार्फत घेतलेल्या डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी इ. ७ वी मध्ये धनश्री दत्तात्रय देवकाते जिल्हा गुणवत्ता यादीत ३४ क्रमांक, अबुलवफा मुजावर हुसेन, केंद्रात व्दितीय, गौरी अजित शिंदे केंद्रात चौथी आली. सांगली जिल्हा परिषदेमार्फत घेतलेल्या डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी इ. ४ थी मध्ये हफ्सा नौशाद तांबोळी केंद्रात प्रथम, श्रेया सतीश माळी केंद्रात तृतीय आली.
इयत्ता ७ वी पर्यंत जि.प.मुलींची शाळा नं. २ मध्ये शिकेलेल्या माजी गुणवत्तापूर्ण मुलींचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत घेतलेल्या NMMS परीक्षा इ. ८ वी मध्ये मयुरी प्रशांत लांडगे ही जिल्हा अ.जा.गुणवत्ता यादीत १८ रँक, अ.क्र. ३८ व एस.एस.सी. इयत्ता १० वी मध्ये साक्षी साहेबराव पाटोळे व प्राची भारत जाधव यांना ८० टक्के च्या वर गुण प्राप्त झाले.
केंद्राचे केंद्र प्रमुख शंकर बेले यांचा उत्कृष्ट कामगिरीबाबत  सत्कार करण्यात आला.
      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रेरणा केंद्रप्रमुख शंकर बेले व मुख्याध्यापक रेखा कोरे यांची मिळाली. मार्गदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोटू शिंदे, उपाध्यक्ष हणमंत कोळी व सर्व सदस्य तसेच शंकर कुंभार, अलका पवार, आरती कांबळे, उद्योगरत्न संकपाळ, जयश्री मगदूम, मनीषा शिंत्रे यांचे लाभले.

1 comment: