Tuesday, August 27, 2019

समग्र शिक्षा अंतर्गत शाळा अनुदानात वाढ करण्याची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
समग्र २०१८-१९ वर्षात समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त अनुदान सुरु करण्यापूर्वी शासकीय आणि स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या शाळांना- शाळा अनुदान, शिक्षक अनुदान आणि देखभाल दुरुस्ती अशा तीन उपशीर्षानिहाय अनुदान दिले जात होते. मागील वर्षी २९ जून २०१८ नुसार निर्गत अनुदानाची तरतूद अत्यंत अपुरी होती. त्यामुळे या अनुदानात वाढ करण्याची मागणी सांगली जिल्हा शिक्षण समितीचे नेते दयानंद मोरे, दीपक कोळी यांनी केली आहे.

शासनाने २१ ऑगस्ट २०१९ च्या संदर्भित पत्रानसार सुधारणा करून अनुदानात वद्धी करण्याचा निर्णय
घेतला. मात्र- १ ते ३० आणि १ ते ६० पटसंख्येच्या शाळांसाठी केलेली तरतूद अजूनही अपुरी आहे. या कमी पटाच्या शाळांना सुद्धा २०१८-१९ पूर्वी पर्यंत किमान अनुदान ८ हजार रुपये (शाळा अनुदान २ हजार शिक्षक अनुदान १ हजार+देखभाल दुरुस्ती ५ हजार) मिळत होते. मागील वर्षी समग्र शिक्षा अंतर्गत १०० पटापर्यंतच्या शाळांना संयुक्त अनुदान १० हजार रुपये देण्यात आले.यावर्षी मात्र ते ३० पर्यंतच्या शाळांसाठी रुपये ५ हजार आणि ६० पर्यंतच्या शाळांसाठी १० हजार मंजूर केले आहे.
वाढती महागाई आणि शाळांच्या अनेकविध भौतिक गरजा लक्षात घेता कमी पटाच्या शाळांसाठी संयुक्त
अनुदानाची केलेली तरतूद अत्यंत अपुरी आहे. शाळांसाठी लागणाऱ्या सुविधा आणि गरजांचा विचार करून अनुदानात वाढ करण्याची आवश्यकता आहे. करिता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून
आपणास विनंती करण्यात येते की, १ ते ३० पटसंख्या आणि १ ते ६० चा पटसंख्या अशी विभागणी न
करता ६० पर्यंत पटसंख्या असणाऱ्या सर्वच शाळांसाठी संयुक्त अनुदान किमान १५ हजार रुपये मंजूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment