Monday, August 19, 2019

जत अंजुमन उर्दू हायस्कूल विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांना मदत

जत,(प्रतिनिधी)-
  येथील मुस्लिम समाज प्रबोधन संस्था संचालित अंजुमन उर्दू हायस्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही  वातावरणात साजरा करण्यात आला. प्रसंगी महाराष्ट्र शासन  अल्पसंख्यांक समाज कल्याण समितीचे सदस्य सलीम गवंडी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला .राष्ट्रीय ध्वज तिरंग्याला मनवंदना देत राष्ट्रगीत सादर करण्यात आला तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले.

इयत्ता 10 वीत शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या जवेरीया नदाफ या गरीब विद्यार्थिनीला मौला मौलाना आझाद विचार मंचचे तालुका अध्यक्ष यांच्या प्रयत्नातून 11 हजार रुपयांचे रोख बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.  येथील मक्का मशिदीचे अध्यक्ष व तरुण  उद्योजक  मुबारक नदाफ व जतचे माजी नगराध्यक्ष पट्टू ऊर्फ इकबाल  गवंडी यांनी आर्थिक साहाय्य  केले. हाजी रशीदभाई पटाईत यांच्या हस्ते सलीम गवंडी व मुबारक नदाफ यांचा शाल व पुष्पहार हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील  विद्यार्थ्यांनी   सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र केलेला निधी मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते हाजी बंदेनवाज पटाईत व मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मकसूदभाई  नगारजी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ.अजीम चट्टरकी, दस्तगीरभाई टपाले यांच्या हस्ते शाळा आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ध्वजारोहणास हाजी,एजाज हुजरे,शाहीमशीदीचे इमाम  शेख अहमद रिझवी, इब्राहिम मुल्ला,बेबीजान मुल्ला, गौतम ऐकळे,ओबीसी संघटने चेअध्यक्ष राजू मुल्ला, नईम चट्टरकी,समीर मुल्ला,आलिअसर नदाफ,आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार मुख्याद्यापक रईसअहमद खान यांनी मानले.

No comments:

Post a Comment