Monday, August 5, 2019

जत येथे प्रेरणा दिवस साजरा

संत निरंकारी मंडळाचा उपक्रम
जत,(प्रतिनिधी)-
जत येथे संत निरंकारी मंडळाच्या   निरंकारी मंडळाचे पाचवे सदगुरु माता सविंदरजी हरदेव महाराज यांच्या स्मृतीनिमित्त एस. आर. व्ही .एम. हायस्कुलमध्ये प्रेरणा दिवस साजरा केला. यावेळी  शिरीष डोंगरे  यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

       शिरीष डोंगरे म्हणाले,ज्यावेळी सन १९८० मध्ये सदगुरु बाबा गुरुबचन सिंह  यांची समाज विघातक धर्ममार्तडांनी हत्या केली त्यावेळी निरंकारी भक्ताच्या अनुयायावर खुप मोठे असे संकट आले.  त्यावेळी सद्गुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज सदगुरू रुपात प्रगट झाले. तेव्हापासुन  बाबाजीच्या खांद्याला खांदा लावुन ३६ वर्षे मानवकल्याणाची सेवा सदगुरु माता सविंदर माताजीनी केली. मे २०१६ मध्ये बाबा हरदेवसिंहजी महाराज आणी जावाई अवनितजी यांनी देह ठेवल्यानंतर अशा दुःखद प्रसंगी तसेच स्वता:ची तब्येत ठीक नसतानाही कशाचीही तमा न बाळगता मानवतेच्या महासुखासाठी गुरुगादीवर विराजमान झाल्या. पहिल्याच प्रवचनामध्ये माताजी म्हणाल्या की जिवनामध्ये कीतीही कठीण प्रसंग आला तर त्याचा विचार न करता फक्त प्रेम,नम्रतेने राहणे हीच खरी भक्ती आहे. दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सदगुरु रुपामध्ये आपली तब्येत ठीक नसताना अहोरात्र प्रचार प्रसार केला. माताजी बोलण्यापेक्षा आपल्या कर्मानेच सर्वांना शिकवन देत असतात. मिशनमध्ये गुरुमर्यादेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आजचा दिवस संपुर्ण विश्वामध्ये प्रेरणा दिवस म्हणुन साजरा करण्यात येत आहे. ममतेची माऊली प्रेमाची सावली सदगुरु माता सविंदर हरदेवजी महाराज आपल्याला सुखाचा मंत्र  देऊन गेल्या. त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या जिवनात उतरवुन आपल्या जिवनाचे कल्याण करावे असे आवाहन केले.
    सुत्रसंचलन प्रकाश माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस आर व्ही  एम हायस्कुलचे प्राचार्य व शिक्षक स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नियोजन जत शाखेचे जोतिबा गोरे, संभाजी साळव सेवक  यांनी केले.

No comments:

Post a Comment