Wednesday, August 7, 2019

तालुक्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी ठप्प

शासकीय,बँकिंग सेवा विस्कळीत
जत,(प्रतिनिधी)-
आर्थिक व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी आग्रह धरीत असताना जत तालुक्यात नेहमीच खंडीत होणा-या कनेक्टीव्हीटीमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे बँका, शासकीय कार्यालयातील अधिकारी,
कर्मचारी हैराण झाले आहेत. तर ग्राहक वैतागले आहेत.इंटरनेटची पायाभूत सुविधा कमकुवत असल्याने जत तालुका ऑनलाईन व्यवहारात आजही मागासलेला राहिला आहे.

सर्वच मोबाईल कंपन्यांचे इंटरनेट सेवा वारंवार ठप्प होता असल्याने लोकांना त्याचा सर्वच स्तरावर मोठा फटका बसत आहे. याची सर्वाधिक झळ बँक व्यवहारात बसत आहे. पैशानभावी तासंतास लोकांना खोळंबून राहावे लागत आहे. त्याचबरोबर खंडित होणा-या वीजपुरवठ्यामुळे टेलिफोन एक्सेंजमधील यंत्रणा जास्त वेळ सुरू राह शकत नाही. यामुळे इंटरनेट सुविधेमध्ये व्यत्यय येत आहे. याचा नाहक त्रास येथील नागरिकांना  होत आहे.
पैशांची देवाण-घेवाण, ऑनलाईन शॉपिंग, शासकीय अर्ज भरणे, शासकीय दाखले मिळविणे अशी बहुतांश कामे ऑनलाईन करण्याचा शासनाचा आग्रह आहे.  रहिवाशी, उत्पन्न, जातीचे दाखले, सातबारा अशा प्रकारचे सर्वच प्रकारचे दाखले ऑनलाइन केल्याने या इंटरनेट कनेक्टिव्हिटी व्यत्ययामुळे कामे होत नाहीत, असा प्रकार झाला आहे.  एक्सेंजमधील यंत्रणा जास्त वेळ सुरू राह शकत नाही. यामुळे इंटरनेट सुविधेमध्ये व्यत्यय येत आहे. याचा नाहक त्रास येथील नागरिकांना होत आहे.
पैशांची देवाण-घेवाण, ऑनलाईन शॉपिंग, शासकीय अर्ज भरणे, निवडणुकीचे अर्ज भरणे, अशी बहुतांश कामे ऑनलाईन करण्याचा शासनाचा आग्रह सुविधा खंडीत झाली होती. आता डेल्टाचे पॉवरबाँड लावल्याने यात सुधारणा झाली असल्याचा दावा आता केला जात आहे.
शासनाच्या बीएसएनएल सारख्या कंपनीचीही इंटरनेट सेवा तर पूर्णतः कोलमडली आहे, जत तालुक्यातील बीएसएनएल यंत्रणा कुचकामी ठरली असून अनेक टॉवर बंद करण्यात आल्याने ग्राहक संख्या कमालीची रोडावली आहे. एकेकाळी फायद्यात असलेली ही कंपनी आज शासनाच्या अनास्थेमुळे तोट्याचे गेली आहे. याचबरोबर खासगी कंपन्यांच्या सुविधेमध्येही व्यत्यय निर्माण होत असल्याने डिजीटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या जतकरांना इंटरनेट सिग्नलची तासंतास वाट पहावी लागत आहे.

No comments:

Post a Comment