Sunday, September 1, 2019

हॉटेलात राहिलेल्या जोडप्याला त्रास देण्याचा पोलिसांना अधिकार नाही'

जर एखाद जोडपे हॉटेलमध्ये राहत असेल तर त्याला त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. एखादे अविवाहित जोडपे हॉटेलमध्ये एका खोलीत राहणे हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. दरम्यान, कलम २१ नुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एकत्र राहू शकता किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

एखाद्या अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये राहणे किंवा परस्पर सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. परंतु, यासाठी ते जोडपे १८ वर्षांपेक्षा अधिक असले पाहिजे अशी अट असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिल विनय कुमार गर्ग यांनी दिली. संविधानातील कलम २१ नुसार दिलेल्या अधिकाराप्रमाणे एखाद्या व्यक्तीला आपल्या र्मजीच्या जोडीदारासोबत राहण्याचा आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यासाठी विवाह करण्याची आवश्यकता नसल्याचेही म्हटले होते.
हॉटेलमध्ये थांबले असता एखाद्या अविवाहित जोडप्याला पोलिसांकडून त्रास दिला गेल्यास अथवा त्यांना अटक केल्यास हे त्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल, असे गर्ग यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ते जोडपे पोलिसांच्या कारवाईविरोधात संविधानातील कलमांनुसार थेट सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकते. याव्यतिरिक्त संबंधित पोलिसांविरोधात पोलिस अधीक्षक किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे, तसेच मानवाधिकार आयोगातही दाद मागण्याची मुभा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केवळ अविवाहित असल्याचे कारण पुढे करून जर हॉटेलनेही त्यांना थांबण्यास परवानगी दिली नाही, तर हेदेखील मूलभूत अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल. तसेच हॉटेल्ससाठी असलेल्या संस्थेचाही असा कोणता नियम नसल्याचे गर्ग यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment