Thursday, October 31, 2019

यंदाही नाही मिळाली 'आशा' ला दिवाळी भेट

जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील 'आशा' कर्मचार्‍यांना यंदाही भाऊबिजेची भेट (मानधन) मिळाली नाही. त्याच प्रमाणे गटप्रवर्तकांनाही कोणतीही दिवाळी भेट देण्यात आलेली नाही.अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्यात येते. हा निर्णय ग्रामविकास, महिला व बालविकास खात्याकडून घेण्यात येतो. मात्र, प्रत्यक्ष घरोघरी जाऊन बाळांचे लसीकरण, गरोदर मातांच्या नोंदणीसह इतरही सर्वेक्षण करणार्‍या आशांच्या पदरी मात्र वषार्नुवर्षे भाऊबिजेची भेट पडलीच नाही.

सुखी आयुष्याला कंटाळून आत्महत्या

एखादी वाईट गोष्ट झाली किंवा नैराश्यामधून आत्महत्या करणार्‍यांच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो पण पुण्यामधील एका वृद्ध दांपत्याने सुखी आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपले आता या जगात काहीच काम नाही त्यामुळे आपण आयुष्य संपवायला हवे या भावनेतून वृद्ध दांपत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. दिवाळीच्या आधी घडलेल्या या घटनेमध्ये वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून महिलेला वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

खाकी वर्दी आहे; पण सन्मान नाही!

होमगार्डसना सेवेत सामावून घेण्याची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
पोलिस दलाला अटीतटीच्या काळात महत्त्वाचे पात्र ठरणार्‍या होमगार्डची व्यथा कुणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करून करीत नाही. राज्यात 42 हजार होमगार्ड्स आहेत. त्यांना कधीही, केव्हाही कामावर बोलावले जाते. त्यांची वर्षातून दोन-अडीच महिने भरतात. त्यात त्यांना मिळत असलेल्या तुटपुंज्या मानधनात आपले समाधान करून घ्यावे लागते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता लागलेली असताना होमगार्ड असूनसुद्धा त्यांना अभिमान बाळगता येत नाही. त्यामुळे ही ओळख लपवत वेठबिगारी म्हणून कामावर जावं लागतं. स्वत:साठी, स्वत:च्या कुटुंबासाठी पाणावलेल्या डोळ्यांनी प्रत्येक होमगार्ड आपली व्यथा मांडताना दिसून येतो.

सावधान!मित्राने पाठवलेली एखादी लिंक घातक ठरू शकते

जत,(प्रतिनिधी)-
सणवार आले की सोशल मीडियावर एखादी लिंक पाठवून मित्रांची मज्जा घेणे ही आजकालच्या काळात खूपच चलनाची गोष्ट झाली आहे. गणेशोत्सवापासून झालेली सणांची सुरुवात दिवाळी आणि पुढे नूतन वर्षापर्यंत सुरूच राहते. यात सोशल माध्यमांवर अग्रेसर असलेले 'नेटकरी' सातत्याने काही ना काही नित्यनवीन आणतच असतात. गंमत म्हणून अधिकाधिक लोक त्या पाहतातही. पण नेमकी हिच गोष्ट घातक ठरू लागली आहे.

शिक्षकांना कर्तव्यावर असताना ओळखपत्र लावणे होणार बंधनकारक


जत,(प्रतिनिधी)-
यापुढे शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी 100 टक्के अनुदानित शाळांतील वर्ग 1 ते 8 च्या शिक्षकांना त्यांच्या खिशावर ओळखत्र लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना शालेय शिक्षण विभागासह प्राथमिक शिक्षण परिषदेने पाठविले आहे.

आजपासून बदलणार बँकांचे नियम, वेळापत्रक


जत,(प्रतिनिधी)-
आज १ नोव्हेंबरपासून देशभरात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येतआहे. नव्या नियमांबाबत जागरुक राहणे गरजेचे असून, या नव्या बदलांमुळे अनेकांना नुकसानही सहन करावे लागणार आहे.

Wednesday, October 30, 2019

एक पणती... व्यसनमुक्तीसाठी!

बाबरवस्ती शाळेत 'तंबाखू मुक्त शाळा' उपक्रम
जत,(प्रतिनिधी)-
सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये 'तंबाखू मुक्त शाळा' अभियान राबवले जात आहे. या उपक्रमाअंतर्गत जत तालुक्यातील पांडोझरी भागातील बाबरवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ' तंबाखू मुक्त  शाळा' अभियांतर्गत दिवाळी सणानिमित्त 'एक म्हणती... व्यसनमुक्ती'साठी हा उपक्रम राबविण्यात आला.

सेनेची फरफट


शिवसेना आपले पाठबळ वाढवून भाजपवर दवाब टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर भाजपदेखील अपक्षांसह बंदडखोरांनाही आपल्या गोठात सामील करून घेण्याच्या प्रयत्नाला लागला आहे. सध्याच्या घडीला सेनेकडे 62 संख्याबळ आहे तर भाजपकडे 112 चे संख्याबळ आहे. सेनेने मुख्यमंत्री पदासह फिफ्टी फिफ्टी फार्म्युल्यावर आपले घोडे अडवून ठेवले आहे. त्यामुळे विधानसभेचा निकाल लागून आठवडा उलटला तरी सत्ता स्थापनेचा घोळ सुरूच आहे. तिकडे हरियाणात सत्ता स्थापन होऊन तिथला गाडाही सुरू झाला आहे. इथे मात्र किती मंत्री कुणाला ,याचाच घोळ घातला जात आहे. आता सगळा निर्णय भाजपलाच घ्यावा लागणार असल्याने त्यांनी आता उपमुख्यमंत्री पद आणि 13 मंत्री पदांची ऑफर सेनेला दिली आहे.

विद्यार्थ्यांना देण्यात येणारी अंडी,दूध,फळे बंद

जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेला दूध,अंडी,फळे यांचा पूरक आहार ऑक्टोबर पासून बंद करण्यात आला आहे. असा आदेश शालेय शिक्षण व महसूल विभागाकडून काढण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त व टंचाईग्रस्त भागातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना जून 2019 पासून शालेय पोषण आहार अंतर्गत दूध,अंडी, फळे असा पूरक आहार  आठवड्यातून तीन दिवस देण्याचा निर्णय झाला होता,त्यानुसार जूनपासून राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक उपलब्धतेनुसार पूरक आहार दिला जात होता.

Tuesday, October 29, 2019

तो जुगारात बायको हरला आणि...

दिवाळीमध्ये आजही देशात अनेक ठिकाणी जुगार खेळला जातो. असाच जुगाराचा डाव रांची येथील एका अड्डय़ावर रंगला होता. हजारीबाग येथील या जुगाराच्या अड्ड्यावर एका दारुड्या पतीने चक्क बायकोला पणाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण, याबाबत त्याच्या पत्नीला कळाल्यानंतर जुगाराच्या अड्डय़ावरील उपस्थित इतर बेवड्यांना तिचा रुद्रावतार पाहायला मिळाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हजारीबाग येथील एका जुगाराच्या अड्डय़ावर पत्त्यांचा डाव रंगला होता. जुगारात एक दारुडा त्याच्याजवळील सगळे पैसे जुगारात हरला. इतर बेवड्यांनी त्याला समजावले व डाव सोडून घरी जाण्याचा सल्ला दिला.

वातावरण बदलाचा आरोग्यावर दुष्परिणाम

घरोघरी वाढला ताप, खोकला;डेंगूचे रुग्ण वाढले
जत,(प्रतिनिधी)-
दरवर्षीप्रमाणे पावसाचा लहरीपणा यावर्षीही कायम होता. पावसाच्या बेभरोश्याच्या वागण्यामुळे शेतमालाच्या पिकांसह मानवाच्या आरोग्य विषयक अडचणी वाढविल्या आहेत. हल्ली सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आरोग्य विषयक समस्या जाणवत असून हा पाऊस आता आरोग्याला घातक ठरत आहे. वातावरणातील हा बदल अनेक आजरांना आमंत्रण देत असून ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुले या वातावरण बदलाच्या समस्येत सापडले आहेत.

माजी आमदार जयंत सोहनी यांचे निधन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याचे माजी आमदार अ‍ॅड. जयंत सोहनी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. जत विधानसभा  मतदार संघातून त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. पेशाने वकील असलेले सोहनी हे मूळचे आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे होते. दुष्काळी तालुक्यांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे.
अँड जयंत ईश्वर सोहनी हे जत विधानसभा मतदार संघातून सलग दोनवेळा निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व जतचे राजे श्रीमंत विजयसिंह डफळे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते. तालुक्यातील तलाव, जलसंधारणाची कामे, रस्ते, दळण-वळण आदी महत्वाची कामे त्यांच्या काळात झाली. 

Monday, October 28, 2019

देवनाळमध्ये पानी फाउंडेशनच्या कामामुळे झाली जलक्रांती

जत,(प्रतिनिधी)-
तालुक्यातील देवनाळ या गावामध्ये 2018-19 या वर्षात पानी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या व पाणलोटच्या कामामुळे गावातील पाझर तलाव, बंधारे व ओढे पाण्याने दुथडी भरुन वाहत आहेत. जत हा राज्यात दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. मात्र ग्रामस्थांचा एकोपा अन्य बाहेरील संस्था व लोकांची साथ मिळाल्याने देवनाळ हिरवंगार झालं आहे.

Sunday, October 27, 2019

उमदी-विजापूर महामार्गाची दुरवस्था

जत,(प्रतिनिधी)-
 उमदी-विजापूर (विजयपूर)  महामार्गाची मोठी दुरवस्था झाली असून वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.  तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

जत शहरात गॅसचा तुटवडा

जत,(प्रतिनिधी)-
शहरासह तालुक्यात ऐन सणासुदीच्या दिवसांत सिलिंडरची मोठय़ा प्रमाणात टंचाई भासत आहे. पैसे मोजूनही नागरिकांना सिलिंडरसाठी दिवसभर ताटकळत थांबावे लागत आहे. ऑनलाइन बुकिंगनंतरही नागरिकांना सिलिंडरसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक कामासाठी वापर होत असल्याने हा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

जतमध्ये १०२ गावात विक्रमसिंह सावंत आघाडीवर


विलासराव जगताप १८, डॉ. रवींद्र आरळी यांची तीन गावात आघाडी
जत,( प्रतिनिधी)-
जत विधानसभा निवडणुकीत १२३ गावांपैकी १०२ गावात काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिह सावंत यांना आघाडी मिळाली आहे. अवघ्या १८ गावात भाजपचेउमेदवार विलासराव जगताप यांना तर तीन गावात जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांना आघाडी मिळाली आहे. ज्या भागात विलासराव जगताप यांना आघाडी
मिळेला, असा अंदाज होता त्या गावातही सावंत यांनी आघाडीत बाजी मारल्याने सर्वांचे निवडणूक अंदाज चुकले. २१ गावे वगळता सर्व गावात विक्रमसिंह सावंत यांना भरघोस मताधिक्य मिळाले आहे. विक्रमसिंह सावंत यांना ८५ हजार १८४, विलासराव जगताप यांना ५२ हजार ५१०, डॉ. रवींद्र आरळी यांना २८ हजार ७१५ मते पडली. जगतापांना १८ गावात मताधिक्य  विलासराव जगताप यांनात्यांच्या गावी कोतेवबोबलाद, आसंगी जत, मायथळ, कुणीकोनूर, रेवनाळ, अंकले, बाज, सोरडी, पडला. राजबाचीवाडी, अक्कळवाडी, अमृतवाडी, शेळकेवाडी, खंडनाळ,पांडोझरी, गुलगुंजनाळ, जाल्याळ खुर्द, वजरवाड व  कोणवगी या गावात आघाडी मिळाली आहे.

Saturday, October 26, 2019

पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना मुख्यमंत्री पद नाहीच

जत,(प्रतिनिधी)-
राज्यात 1972 ते 1977 या काळात सर्वाधिक म्हणजे 28 महिला आमदार निवडून आल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही विधानसभा निवडणुकीत इतक्या संख्येने महिला आमदार निवडून आलेल्या नाहीत. आताच्या निवडणुकीत 24 महिला आमदार निवडून आल्या आहेत. 2014 मध्ये 20 महिला आमदार निवडून येऊन विधानसभेत पोहचल्या होत्या.पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्र अशी राज्याची ओळख असली तरी सुमारे सहा दशकांच्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात अद्यापही महिलेला मुख्यमंत्रिपद मिळालेले नाही.

Friday, October 25, 2019

'वंचित'मुळे काँग्रेस आघाडीला फटका

32 उमेदवार पडले
जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील 288 मतदारसंघापैकी 32 जागांवर वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले असले तरी 32 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.

भटक्या कुत्र्याची शहरात वाढती संख्या

नसबंदी मोहीम राबवण्याची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
कुत्र्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेतर्फे कुत्र्यांची नसबंदी मोहीम  आजपावेतो राबवली गेली नसल्याने जत शहरातल्या  भागाभागात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. कुत्र्यांना पकडण्याच्या डॉग वाहनांची व्यवस्था करण्यात यावी व नसबंदी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

तंटामुक्त, गाव समित्या कागदावरच

जिल्ह्यातील स्थिती;गावोगावी भांडणे, तंटे सुरूच
जत,(प्रतिनिधी)-
गाव तंटामुक्त, निर्मलग्राम होतात, दारुबंदी केली जाते. मात्र खऱ्या अर्थाने ही यशस्विता कागदोपत्रीच दिसून येते. जी गावे तंटामुक्त झाली आहेत,त्याच गावात हाणामाऱ्या होत आहे. समित्या फक्त कागदावरच राहिल्या आहेत.
स्वच्छता अभियान असो किंवा निर्मलग्राम असो किंवा तंटामुक्त गाव असो अशा विविध योजनांसाठी गावोगावी अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र या समित्यांचा काहीच उपयोग गावांना होताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वी जत तालुक्यातील बहुतांश गावे निर्मलग्राम झाली. मात्र आज या गावाची परिस्थिती पाहण्याजोगी झाली आहे.

Thursday, October 24, 2019

बँके मॅनेंजर ते आमदार

जतच्या राजकारणात आणि समाजकारणात सावंत घराण्याचे योगदान खूप मोठे आहे. गेल्या अनेक दशकापासून हे घराणे जतेच्या राजकारणात मातब्बर समजले जाते. परंतु याच घराण्याचे तिसरे वारसदार विक्रमसिंह सावंत यांनी गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणात भाजप तथा विलासराव जगताप यांच्या गटाला झुंज देत अखेर तालुक्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारती बँकेचा शाखाधिकारी, जिल्हा बँकेचा संचालक, जिल्हा परिषदेचा सदस्य ते आमदार पदापर्यंत त्यांनी केलेला प्रवास थक्क करणारा आहे. विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांनी ऑक्टोबर २०१९ च्या निवडणुकीत जत मतदारसंघातून तब्बल ३५ हजाराचे मताधिक्य घेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. बी. कॉम. चे शिक्षण पूर्ण केलेले सावंत हे सुरुवातीस जतच्या राजकारणात सक्रीय नव्हते. भारती बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून नोकरी करीत असतानाच, त्यांनी गेल्या पंधरा वर्षापूर्वी जतेत सक्रीय राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीस त्यांनी उमदी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढवली.

महाराष्ट्रातील संस्कृती वैभव :किल्ला

महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. आमच्या पराक्रम आणि संघर्षांची ही प्रतीके आहेत. या गडकोटांच्या स्मृती जपाव्यात आणि पूर्वजांच्या पराक्रमाच्या नौबती पुन्हा घडाव्यात जणू यासाठीच या किल्ले बनवण्याच्या परंपरेचा उदय झाला असावा. दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बांधणीची प्रथा कशी सुरू झाली, याबाबत ठोस तपशील उपलब्ध नाहीत. मात्र, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याचा लहान मुलांचा सुट्टीतील विरंगुळा जणू परंपराच बनला आहे.

'जत'ला 'विक्रम पर्वा'ची सुरुवात

विक्रमसिंह सावंत 35 हजार  मताधिक्याने विजयी
जत,(प्रतिनिधी)-
काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत यांनी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांचा दारुण पराभव करत काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून दिले. जत विधानसभा मतदारसंघात भापजची सलग पंधरा वर्षे सत्ता होती, ती आता संपुष्टात आली आहे. विक्रमसिंह सावंत यांना या निवडणुकीत 87 हजार 184 मते मिळाली तर विलासराव जगताप यांना 52 हजार 510 मते मिळाली. तिसऱ्या आघाडीच्या डॉ.रवींद्र आरळी यांना 28 हजार 715 मिळाली. यात विक्रमसिंह सावंत 34 हजार 674 इतक्या मोठ्या फरकाने विजयी झाले.

Wednesday, October 23, 2019

सर्वसामान्यांमध्येही खादीची क्रेझ वाढली

जत,(प्रतिनिधी)-
दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करत असताना तरुणांसह तरुणींमध्ये खादीची कपडे खरेदी करण्याकडे वाढता कल असल्याचे पाहावयास मिळत होते. विशेष म्हणजे खादीच्या लिनन कॉटनकिंग, केंब्रिज या ब्रँडच्या खादीला मागणी वाढली असल्याचेही दुकानदारांकडून सांगण्यात आले. पारंपरिक कुर्ते, जीन्ससह बेसकोट व प्रिंटेड रेडिमेडला खरेदीवर ग्राहकांचा जोर होता.
सध्या हातमागावर तयार होणार्‍या मुलायम कपडे वापरण्याचा ट्रेंड वाढत आहे. त्यालाही कारणही तसेच आहे.

यंदा तुळशी विवाहानंतर ४६ शुभमुहूर्ताचा योग


जत,(प्रतिनिधी)-
दिवाळी सणाच्या नंतर यंदा कर्तव्य आहे, असे म्हणणार्‍यांना आता तुळशी विवाह झाल्यानंतर आठ दिवसानंतर लग्नाचे बाशिंग बांधता येणार आहे. परंतु यंदा डिसेंबर महिन्यापासून गुरुचा अस्त असल्यामुळे महिनाभर शुभ मुहूर्त नाहीत. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४६ शुभमुहूर्त आहेत. येत्या २७ तारखेला लक्ष्मीपुजन, तर १२ नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह होणार आहे.

Tuesday, October 22, 2019

ग्रुपमध्ये सामील करून घेण्यासाठी आता युजरची परवानगी

व्हाट्सएपचे नवे फिचर
जत,(प्रतिनिधी)-
 दररोज कुणीतरी आपल्याला नवीन व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतो. त्यामुळे ग्रुप्सची संख्या खूपच वाढते. आपली इच्छा नसली तरीही लोक युजरला आपापल्या ग्रुपमध्ये सामील करून घेतात. आता हे टाळता येणार आहे. मात्र आता युजरने परवानगी दिली तरच कुणीही नव्या ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकेल. व्हॉट्सअॅपमध्ये हे नवे फीचर आता येणार आहे.

महिलांसाठी यूपी आणि महाराष्ट्र सर्वात असुरक्षित

महिलांच्या सुरक्षेबाबतचा राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल जारी झाला आहे. त्यात महिलांसाठी उत्तर प्रदेश सर्वात असुरक्षित राज्य असल्याचे नमूद केले आहे. महिलांसाठी असुरक्षित राज्यांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले असून लक्षद्वीप महिलांसाठी सर्वात सुरक्षित प्रदेश असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार देशात महिलांवरील गुन्ह्यांमद्ये ६ टक्क्याने वाढ झाली आहे. २0१७मध्ये संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराचे ३,५९, ८४९ गुन्हे नोंद झाले आहेत. २0१६मध्ये हा आकडा ३,३८,९५४ एवढा होता.

जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने द्राक्ष बागांमध्ये दावण्या रोगाने मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्याने द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. तालुक्यात अलीकडच्या काही वर्षांत द्राक्ष बागायत शेती वाढत आहे. याचा फटका उत्पादन नावर होणार आहे.चालू वर्षी प्रचंड उन्हाचा तडाखा व चांगल्या पद्धतीचा पाऊस झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारे द्राक्ष बागेची काळजी घेत चांगली काडी तयार करून वेळेत फळ धारणा घेण्याचे नियोजन केले होते. वेळेत छाटणी झाली होती. दुष्काळी भागात परतीचा पाऊस असला तरी जोराचा नसल्याचा अनुभव असल्याने शेतकरी द्राक्ष बागेकडे वळला आहे. त्यामुळे लागवड क्षेत्र वाढले आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस या भागातील शेतकरी जत तालुक्यात शेती घेऊन द्राक्ष पीक घेत आहेत.
या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला आहे. सुरुवातीला नसला तरी नंतर पावसाने दमदार हजेरी लावली.

Monday, October 21, 2019

सांगली जिल्ह्यात 66 टक्के मतदान

सांगली, (प्रतिनिधी)-
 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सांगली जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघात एकूण 23 लाख 76 हजार 304 मतदारांपैकी आज अंदाजे सरासरी 65.98 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतांचा अंतिम ताळेबंद लागल्यावर यात वाढ अथवा घट होऊ शकते, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

Saturday, October 19, 2019

३,२३७ उमेदवारांपैकी महिला उमेदवार फक्त २३५

मागच्या चार विधानसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या महिला उमेदवारांची संख्या वाढत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ३,२३७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात २३५ म्हणजे फक्त ७.३ टक्के महिला उमेदवार आहेत. महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात १५२ मतदारसंघातून महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

राज्यात 18 ते 25 वयोगटातील 1 कोटी मतदार

राज्यात १८ ते २५ वयोगटातील १ कोटी ६ लाख ७६ हजार १३ तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये ६0 लाख ९३ हजार ५१८ युवक तर ४५ लाख ८१ हजार ८८४ युवती आहेत. ६११ तृतीयपंथी मतदारांची नोंदही करण्यात आली आहे.  ४ ऑक्टोबर २0१९ पयर्ंत करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये ८ कोटी ९९ लाख ३६ हजार २६१ मतदारांची नोंदणी झाली आहे. या नोंदणीत एकूण ५ हजार ५६0 अनिवासी भारतीयांची नोंद झाली असून यामध्ये अनिवासी भारतीय पुरुष ४ हजार ५४ आहेत तर १ हजार ५0६ अनिवासी भारतीय महिलांची नोंद आहे.

Friday, October 18, 2019

जत मतदार संघात काट्याची तिरंगी लढत

जत,(प्रतिनिधी)-
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्यात आली आहे. जत विधानसभा मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत होत आहे. भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत आणि भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उभा राहिलेले डॉ. रवींद्र आरळी यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. निवडणुकीचा प्रचार गावागावात आणि घराघरात पोहचला आहे. सगळ्यांनाच कोण जतचा आमदार होणार याची उत्सुकता लागली आहे.

सामाजिक बांधिलकी जपणारे राजकीय व्यक्तिमत्त्व:डॉ. आरळी

डॉ.रवींद्र आरळी म्हणजे एक प्रसन्न आणि हसमुख व्यक्तिमत्त्व. डॉक्टरांनी हसून रुग्णाची आस्थेवाईकपणे चौकशी केली की त्याचा निम्मा आजार पळून जातो. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये लोकप्रिय असलेलं हे व्यक्तिमत्त्व समाजकारणातही तितकंच प्रभावीपणे वावरलं आहे. राजकारणापेक्षा समाजकारणात रममाण झालेलं हे व्यक्तिमत्त्व समाजाच्या आरोग्य, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी सतत झटत राहिलं आहे. भाजप पक्षाही निष्ठा ठेवून डॉ. आरळी राजकारण करत राहिले. त्याची पोहोच त्यांना पक्षाने वेळोवेळी पक्ष संघटनेत जबाबदार पदे देऊन केली आहे. पर्यटन विकास महामंडळावरही त्यांची वर्णी लावण्यात आली. त्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली आहे.

जत तालुक्याला हवंय काय?

जत तालुक्याला पाणी महत्त्वाचे आहे. पाणी असेल तर शेतकरी शेती करू शकतो. त्यामुळं चार मजुरांना काम मिळते. पाण्यामुळे लहान मोठे फळ प्रक्रिया सारखे उद्योग उभारले जाऊ शकतात. पाण्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. जत तालुक्यात बाहेरून पाणी सहजगत्या येऊ शकते, हे आता स्पष्ट झाले आहे. राजकारण्यांनी पाण्याची व्यवस्था केली तर बाकीचा विकास त्यांना करावा लागत नाही,तो आपोआप होतो. आता काही भागात पाणी पोहचले आहे. जत तालुक्यात सर्वच भागात पाणी खळाळल्यास राजकारण्यांना फार काही करावं लागणार नाही. पण गेल्या पन्नास साठ वर्षात पाणी देण्याचे आश्वासनच इथल्या लोकांना ऐकावे लागले आहे. सध्या तालुक्याच्या एका कोपऱ्यात पाणी आले आहे. संपूर्ण तालुक्यात पाणी कधी खळाळणार हा प्रश्नच आहे.

Wednesday, October 9, 2019

जतमध्ये शिक्षकांसाठी बहुउद्देशीय सभागृह उभारण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात 1 हजार 200 च्यावर प्राथमिक शिक्षक संख्या आणि 470 च्या आसपास शाळा आहेतअनेकदा सर्व शिक्षक किंवा मुख्याध्यापकांच्या एकत्रित बैठका बोलवल्या जातात,मात्र जतमध्ये अशी एकही इमारत नाहीजिथे सर्व शिक्षक बसू शकतीलत्यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला खासगी शाळांपुढे हात पसरावे लागतातया शाळा सहकार्य करीत नसल्याने शिक्षकांना जागा उपलब्ध होईलतिथे भारतीय बैठक मारून सभा उरकावी लागतेयासाठी जिल्हा परिषदेने तालुकास्तरावर बहुउद्देशीय सभागृह बांधावेअशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.

सांगली जिल्ह्यात 200 जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारती

सर्वाधिक 48 इमारती जत तालुक्यात;पाडण्याची प्रक्रिया संथ 
जत,(प्रतिनिधी)-
सोलापूर जिल्ह्यात शाळेची इमारत पडून तीन मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. परवा जत तालुक्यातील माडग्याळ येथील शाळेची इमारत रात्री पडली त्यामु़ळे जीवीत हानी झाली नाही.मात्र पावसाळ्यात अशा धोकादायक इमारती पडण्याची भीती अधिक असते. सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह विविध विभागाच्या  धोकादायक इमारतींची संख्या 200 च्यावर आहे. तर आतापर्यंत साडेतीनशे इमारती पाडण्यात आल्या आहेत. काही अनर्थ घडू नये म्हणून  या इमारती पाडून निर्लेखन करण्याची आवश्यकता आहे.
सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसह आरोग्य केंद्र,ग्रामपंचायतीच्या 548 इमारती धोकादायक होत्या. त्यांपैकी साडे तीनशे इमारतींवर हातोडा चालवण्यात आला आहे ,अद्याप 200 खोल्या धोकादायक स्वरूपात आहेत.त्या पाडण्याची प्रक्रिया सुरू असली तरी त्याचा वेग फारच कमी आहे.

पशुधनकडील 76 पदे रिक्त: खासगी डॉक्टरांची चलती

सांगली जिल्ह्यातील चित्र;ग्रामीण अर्थकारणावर परिणाम
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात कोंबड्यांची संख्या सोडल्यास जनावरांची संख्या सुमारे 14 लाख इतकी आहेपोल्ट्रीफार्म आणि अन्य देशी,हायब्रीड कोंबडयांची संख्या जवळपास 21 लाख आहेजिल्ह्यातील ग्रामीण विशेषता दुष्काळी भागातील अर्थकारण या पुरक व्यवसायावर अवलंबून आहेमात्र विविध आजारदुष्काळ आदींमुळे बळी जाणार्या जनावरांची संख्याही मोठी आहेत्यामुळे शेतकर्यांना सातत्याने आर्थिक फटाक्याला सामोरे जावे लागत आहेजिल्ह्यात पशुधन विभागाकडील सुमारे पन्नास टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेयाचा फटका शेतकर्यांना बसत आहे.

Tuesday, October 8, 2019

जत शहरात साथीच्या रोगांचे थैमान

जत,(प्रतिनिधी)-
विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीमध्ये प्रशासनाचे व आरोग्य विभागाचे जत शहरातील डेंगूच्या साथीकडे दुर्लक्ष होत असून या दुर्लक्षामुळे शहरातील डेंगूच्या साथीसह साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे.ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने युध्द पातळीवर प्रयत्न करावेत अशी मागणी जत शहरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Monday, October 7, 2019

राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला

जत,(प्रतिनिधी)-
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभूतपूर्व यशाचे स्वप्न पाहत निवडणूक प्रचारासाठी दिवसरात्र एक करत आहेत. दरम्यानच्या काळात फडणवीस सरकार राज्याच्या विकासाचा आलेख उचावत असल्याचा दावा सतत करत असले, तरी देखील दुसरीकडे राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सन २0१४ मध्ये जेव्हा फडणवीस सरकार सत्तेत आले, त्यावेळी राज्यावर एकूण १.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र, जून २0१९ पयर्ंत हा कर्जाचा डोंगर वाढत जात तो ४.७१ लाख कोटी रुपये इतका झाला आहे.

Wednesday, October 2, 2019

आता तिसऱ्या उमेदवाराची प्रतीक्षा

भाजप-काँग्रेसचे उमेदवार निश्चित;दोन्हीकडे नाराजी
जत,(प्रतिनिधी)-
भाजप आणि काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीतच जत विधानसभा मतदारसंघातील आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्याने अन्य इच्छूक मंडळींची धडपड थांबली असली तरी ही नाराज मंडळी काय पवित्रा घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. तिसरा उमेदवार निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित असले तरी तो दोन्हीकडील नाराज गटाकडून येणार की वंचित आघाडी आपला उमेदवार देणार,हाच प्रश्न बाकी आहे.

जत परिसरात आढळली दुर्मिळ कंदीलपुष्प वनस्पती


जत,(प्रतिनिधी)-
राजे रामराव महाविद्यालय, जत च्या परिसरात दुर्मिळ सिरोपेजिया बलबोसा या वनस्पतीची लुशी ही दुर्मिळ प्रजात वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. कु. वसुंधरा खोत यांना आढळली.  याबाबत अधिकची माहिती देताना त्यांनी सांगितले की, आकाश कंदील सारखी या वनस्पतीच्या फुलाची रंगीबेरंगी सुंदर रचना असल्यामुळे याला 'कंदिलपुष्प' म्हणतात. फुलांचा रंग पांढरा, पिवळा, हिरवट असून त्यावर लाल, जांभळ्या ठिपक्यासोबतच रेघांची सुंदर नक्षी असते. जुलै ते सप्टेंबरमध्ये उमलणाऱ्या कंदीलपुष्पाचे तब्बल ६१ प्रकार भारतामध्ये बघायला मिळतात.