Tuesday, November 12, 2019

बोगस डॉक्टरवर तीन वर्षे कारावासाची शिक्षा


डफळापूर,(प्रतिनिधी)-
बोगस डॉक्टर प्रकरणी जत तालुक्यातील डफळापूर येथील आरोपी प्रणोय ऊर्फ अविक परिमल मलिक यास तीन वर्षे सक्षम कारावास व 10 हजार रुपयांचा दंड व न दिल्यास साध्या कारावासाची शिक्षा जत न्यायालयाने मंगळवारी सुनावली.

कुडणुर शिंगणापूरला एसटीची मागणी

जत ,(प्रतिनिधी)-जत तालुक्यातील कुडणुर, शिंगणापूर या गावांना एसटी बस ची सोय 15 वर्षापासून बंद आहे त्यामुळे गावातील नागरिक,विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग या प्रवाशांची गैरसोय होत आहे तातडीने या गावांना एसटी बस ची सुविधा मिळावी या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे,विलास सरगर यांनी आगारप्रमुख यांना दिले .

शिक्षक बँकेच्या नूतन अध्यक्षानी व्याजदर कमी करावा

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातुन शिक्षक बँकेवर निवडून गेलेले संचालक  यांची शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याने त्यांनी सत्त्तेच्या शेवटी तरी व्याजदर कमी करावा अशी मागणी जत तालुका शिक्षक भारती चे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी केली आहे  शिक्षक बँक ही  सभासदांची कामधेनु आहे मात्र शिक्षक बॅंकेच्या कारभाराबाबत शिक्षक सभासद समाधानी नाहीत व्याजदर कपातीच्या बाबतीत सत्ताधारी दिशाभूल करत आहेत जणू बॅंकेचा कारभार आपणच पारदर्शी चालवत आहोत असा कांगावा केला जात आहे वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे वार्षिक अहवाल २०१८-१९ नुसार सरासरी ठेवींचा व्याजदर ८.३८% असताना कर्जाचा व्याजदर मात्र १३.५% आहे हे आता लपून राहिलेले नाही .

Sunday, November 10, 2019

सावित्रीच्या लेकींची रुपायावर बोळवण

२५ वर्षापासुन जि. प. शाळांतील मुलींना दररोज एक रुपया उपस्थिती भत्ता
जत, (प्रतिनिधी)-
दारिद्र्यरेषेखालील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातीतील पहिली ते चौथी पर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो. गत २५ वर्षांपासून या प्रोत्साहन पर भत्त्यात सरकारने एका पैशाचीही वाढ केली नाही. सावित्रीबाई फुले यांच्या नावे सुरू केलेल्या योजनेतील प्रोत्साहन भत्ता वाढविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधी कडून होत नसल्याने विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे.

...अखेर माडग्याळ बाजारातील वाहतूकीची कोंडी फुटली; प्रवाशांकडून समाधान

पोलिसांनी लावली शिस्त
माडग्याळ,(वार्ताहर)-
महाराष्ट्र राज्यात शेळ्या-मेंढ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जत तालुक्यातील माडग्याळ येथे  दर शुक्रवारी भरणाऱ्या  आठवडी बाजारात जत-चडचण या राज्य महामार्गावर होणारी वाहतुकीची  सततची कोंडी सोडवण्यात  अखेर माडग्याळ  औट पोस्टच्या पोलिसांना यश आले आहे.तरुणभारतमधून याबाबत बातमी प्रसिद्ध होताच पोलिसांना लागलीच जाग आली. गेल्या  आठवडी बाजरी हवालदार बसवराज कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि होमगार्ड यांनी बेशिस्तपणे गाड्या लावून जाणाऱ्या चालकांना शिस्त लावली. वाहतूक सुरळीत केली. बाजारातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या-येणाऱ्या एसटी बसेस आणि इतर गाड्या वेगाने जात होत्या. त्यामुळे प्रवाशी वर्गातुन समाधान व्यक्त केले जात होते.

Tuesday, November 5, 2019

गंमतीत दारू आणि अंडी

मित्राशी गंमतीत लावलेली पैज मृत्यूचे कारण ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा ५0 अंडी खाण्याच्या पैजेपायी मृत्यू झाला. वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे ही घटना घडली आहे.
शुक्रवारी(दि.१) संध्याकाळी सुभाष यादव (४२) नावाचा व्यक्ती अंडी खाण्यासाठी मित्रासोबत बीबीगंज बाजारात गेले होते. अंडी खाताना, कोण किती अंडी खाऊ शकते याबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि गंमती गंमतीत दोघांमध्ये अंडी खाण्यावरून पैज लागली. ५0 अंडी आणि एक बाटली दारू पिण्याची ही पैज जिंकण्यास दोन हजार रुपये देण्याचे ठरले. सुभाषने पैज मान्य केली आणि अंडी खायला सुरुवात केली. त्यांनी ४१ अंडी खाल्ली, पण ४२ अंडे खाताच ते बेशुद्ध झाले. तेथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याचे पाहून तेथून सुभाष यांना लखनौच्या रुग्णालयात हलवले. तेथे रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुभाष यांनी याच वर्षी दुसर्‍यांदा लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून चार मुली झाल्यामुळे मुलासाठी त्यांनी नऊ महिन्यांपूर्वीच दुसरा विवाह केला होता. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष यांची दुसरी पत्नी सध्या गर्भवती आहे. परिसरात ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

   

Monday, November 4, 2019

मैत्रिणीवर दोन भावांचा बळजबरी अत्याचार

नागपूर शहरातील वाढत्या अपराधावर चिंता व्यक्त होत असताना, शहरात एका २४ वर्षांच्या तरुणीवर तिचा मित्र व मित्राच्या भावाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तरुणीला घरी बोलावून तिच्या मित्राने व त्याच्या लहान भावाने एकाच दिवशी वारंवार अत्याचार केले. आरोपीच्या कुटुंबीयांनीही आरोपींची साथ दिली. तरुणीचे अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देऊन तिला लग्नासाठी देखील बळजबरी करण्यात आली. यानंतरही पीडितेवर अत्याचार करण्यात आले. मुकेश राऊत असे आरोपीचे नाव असून, आरोपात साथ देणार्‍या आरोपीचा मोठा भाऊ आणि लहाण भावाला पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

Saturday, November 2, 2019

राज्यभरातून २६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त

दिवाळीत मिठाई किंवा खवा, मावा खाल्ल्यानंतर घसा खवखवत असेल तर आश्‍चर्य वाटून घेऊ नका. यंदा दिवाळीच्या काळात मोठय़ा प्रमाणात भेसळयुक्त खवा, मावा, मिठाई, तेल, तुपासह इतर पदार्थ बाजारात दाखल झाले असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. दिवाळीच्या दिवसात राज्यभरातून जवळपास ३ कोटी रुपयांचा खवा किंवा मावा, ४ कोटी रुपयांची मिठाई, ११ कोटी रुपयांचे तेल, वनस्पती, तूप आणि ६ कोटी रुपयांचे इतर भेसळयुक्त अन्नपदार्थ प्रशासनाने जप्त केले आहेत.
राज्यातून १ हजार ९५८ किलो भेसळयुक्त खवा किंवा मावा प्रशासनाने जप्त केला असून ११६ नमुने गोळा केले आहेत. सर्वाधिक भेसळयुक्त खवा नाशिक (८७७ किलो) आणि नागपूरमध्ये (६४४ किलो) आढळला आहे. ३ हजार किलो भेसळयुक्तमिठाई प्रशासनाने ताब्यात घेतली असून यात अमरावती (१,३७६ किलो) आणि ठाणे(१,४२८ किलो) भागात अधिक प्रमाणात सापडली आहे.

व्हॉट्स अप कॉर्नर

पूजा करायच्या आधी, विश्वास ठेवायला शिका.
बोलायच्या आधी ऐकायला शिका.
खर्च करायच्या आधी कमवायला शिका,
लिहायच्या आधी विचार करायला शिका,
हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका.
आणि मरायच्या आधी जगायला शिका.
-------------------------------------------------------------------

पिकांची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी-प्रभाकर जाधव

जत,( प्रतिनिधी)-
 अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी आजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जत तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून  पडत असलेल्या सत्ततच्या परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. परंतु सदरच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे रब्बीचा पीकांचे देखील मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेले आहे. द्राक्ष, डाळिंब व इतर फळबागायत पिकांचे देखील पावसामुळे मोहर गळणे, विविध प्रकारचे रोग निर्माण होणे व इतर कारणांमुळे मोठया प्रमाणात हानी झालेली आहे.

Friday, November 1, 2019

बोकडाचे मटण झाले 520 रुपये किलो


दर आणखी वाढण्याची शक्यता; कातड्याला दर नाही
जत,(प्रतिनिधी)-
बोकड्याच्या कातड्याची विक्री होत नसल्याने मटणाचा व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसायात फायदा पडत नसल्याने बोकडाच्या मटणाच्या दरात तब्बल 40 रुपयांची वाढ केल्याने मटणाचा दर किलोला 520 रुपये झाला आहे. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या खवय्यांची पंचाईत झाली असून नाईलाजाने त्यांचा ओढा बॉयलर चिकनकडे वाढला आहे. खवय्यांना दुधाची तहान ताकावर भागावण्याची वेळ आली आहे.

माडग्याळमधील वाहतूक कोंडी काही सुटेना

पोलीस चिरीमिरीत मश्गुल;ग्रामपंचायत प्रशासन सुस्त
जत,(प्रतिनिधी)-
पोलीस चिरीमिरीत गोळा करण्यात व्यस्त तर ग्रामपंचायत प्रशासन सुस्त असल्याने माडग्याळच्या आठवडी बाजारासह अन्य दिवशी जत-उमदी रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही फुटेना.त्यामुळे प्रवाशांना आणि ग्रामस्थांना हकनाक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात अशा प्रकारची वाहतूक कोंडी  कुठेच होत नसल्याचे सांगितले जात आहे.

नोव्हेंबरमध्ये तब्बल 10 दिवस बँका बंद राहणार

जर तुम्हाला बँकांसंबंधी काही कामे असतील तर लवकर उरकून घ्या. या महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात एक, दोन नव्हे तर १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. या १२ दिवसात आठ सुट्टय़ा आणि चार रविवार यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या राज्यात बँका बंद राहणार असून या सुट्टय़ांचा महाराष्ट्र राज्यावर फारसा परिणाम पडणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

बदलत्या जीवनशैलीमुळे वयोमानात घट

जत,(प्रतिनिधी)-
बदललेली जीवनशैली तसेच धकाधकीच्या जीवनात मानवाचे आपल्या आरोग्याकडे लक्ष नसल्याने वयोमान घटत चालले आहे. धकाधकीचे जीवन, फास्ट फूडसह दूषित वातावरणाचा परिणाम शारीरिक कवायतींच्या अभावामुळे सद्याच्या पिढीच्या वयोमानामध्ये घट होऊन त्यांचे आयुर्मान 60 ते 65 वर्षांवर आले आहे. दोन दशकांपूर्वीची पिढी आपल्या आरोग्याबाबत जागरूक असायची. त्याचप्रमाणे सदरची पिढी र्शमदानामध्ये स्वत:ला झोकून देत असे. त्यामुळे त्या पिढीचे आयुष्यमान 80 ते 90 वर्षांपर्यंत राहत होते. त्यावेळी मिळणारा सकस आहार आज मिळत नाही. धावपळीच्या युगामध्ये दिवसरात्र पळावे लागत असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.